Join us

"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:56 PM

प्राजक्ताने तिच्या मामाच्या गावचा खास व्हिडीओ शेअर करत एका अनोख्या परंपरेचा उलगडा केलाय (prajakta mali)

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध मालिका, सिनेमा आणि वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता सध्या मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. प्राजक्ता सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करत असते. अशातच प्राजक्ता तिचं मामाचं गाव अर्थात पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी येथे गेली होती. गावातील अनोखी परंपरा प्राजक्ताने सांगितली.

प्राजक्ताने शेअर केलेल्याा व्हिडीओत भाळवणी गावातील अनोखी परंपरा दिसते. या व्हिडीओत प्राजक्ताच्या लहान भाचीही खेळताना दिसत आहेत. प्राजक्ता सुद्धा गावातील वयोवृद्ध माणसांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने गावातील अनोखी परंपरा सांगितलीय. प्राजक्ता लिहिते,  "मामाच्या गावाला जाऊया…२ मित्र मैत्रीत एकमेकांना वचन देतात, “आपण नाही राहिलो तरी जोवर चंद्र-सुर्य आहेत तोवर आपली मैत्रीची आठवण राहील. ही कावड चालू राहील. तुझ्या समाजातील भांडण सोडवायला माझा समाज धावेल, माझ्या समाजातील अडचणी तुझा समाज सोडवेल. इथून पुढे एकमेकांच्या पाठीशी दोन्ही बाजू खंबीरपणे उभ्या राहतील.”

प्राजक्ता शेवटी लिहिते, "आणि त्यांनी दिलेलं वचन हे गावकरी गेली ५-६ पिढ्या निगुतीनं पाळतायेत; ही कावड आजही चालू आहे आणि दोन समाजांमधील प्रेम अबाधित आहे. सगळी कामं बाजूला ठेवून सगळे कावडीला खांदा द्यायला सगळे धावून येतात." प्राजक्ताच्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत या परंपरेचं कौतुक केलंय. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय.

टॅग्स :प्राजक्ता माळीपंढरपूरमराठीमहाराष्ट्राची हास्य जत्रा