आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यानंतर प्राजक्ता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर परतली आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. अखेर हास्यजत्रा फोटोशूट परत आले...असं कॅप्शन तिनं या फोटोशूट सोबत दिलं आहे. आमच्याकडे पण बघत जा ग नुसते खाली काय बघतेस, गौरव मोरे : आता ग माय मरतो की काय, प्राजक्ता परत लहान होत चालली ... अशा भन्नाट कमेंट्स तिच्या चाहत्यांनी या फोटोवर दिल्या आहे.
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची लकडाउनमध्ये पाहायला मिळाली. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळत आहे.