Join us

प्रत्युषा बॅनर्जीची शेवटची शॉर्ट फिल्म 'हम कुछ कह ना सके' रिलीज करणार काम्या पंजाबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 10:14 AM

प्रत्युषाशी निगडीत काही सत्य गोष्टीही या फिल्ममध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तिच्या आठवणींनाही उजाळा देण्यात येणार आहे.

'बालिका वधू' ही छोट्या पडद्यावरील मालिका सुरुवातीपासून रसिकांमध्ये लोकप्रिय ठरली.. बालपणीची आनंदी तर घराघरात भावली होती. काही भागानंतर या मालिकेने लिप घेतला आणि मोठी आनंदी बनत प्रत्युषा बॅनर्जीने छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री घेतली. प्रत्युषाने साकारलेल्या आनंदीलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. अल्पावधीतच छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली टीव्ही अभिनेत्री प्रत्युषाने मानसिक तणावाखाली येवून आत्महत्या केली . ती आज या जगात जरी नसली तरी तिच्या मित्र - मैत्रिंणीसाठी ती आजही त्यांच्या आठवणींत जिवंत आहे.प्रत्युषाने आत्महत्या करण्यापूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. ती शॉर्ट फिल्म अद्यापही प्रदर्शित करण्यात आलेली नाहीय. प्रत्युषाचे शेवटचे काम लोकांसमोर यावे यासाठी प्रत्युषाची बेस्ट फ्रेंड काम्या पंजाबीने पुढाकर घेत ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित करणार आहे.विशेष म्हणजे‘हम कुछ कह ना सके'ही शॉर्ट फिल्म डिप्रेशनवर आधारित आहे.त्यामुळे यांत प्रत्युषाशी निगडीत काही सत्य गोष्टीही या फिल्ममध्ये दाखवण्यात आल्या आहेत.या शॉर्ट फिल्म  विषयी माहिती देताना काम्या पंजाबीने सांगितले की,ही फिल्म सत्य घटनेवर भाष्य करत नसली तरीही प्रत्युषाच्या खाजगी आयुष्याशी मेळ खाणारी आहे. सिनेमातील  प्रत्युषाचा ऑनस्क्रीन  बॉयफ्रेंडचे नावही राहुलच आहे.सिनेमातही रिअल बॉयफ्रेंडचेच नाव कॅरेक्टरला देण्यात यावी अशी खुद्द प्रत्युषाचीच इच्छा होते. त्यानुसार सिनेमातील ऑनस्क्रीन बॉयफ्रेंडला राहुल हेच नाव देण्यात आले.नेमके जेव्हा सिनेमाचा क्लायमॅक्स शूट होणार होता त्याच्या आधीच प्रत्युषाने आत्महत्या केली असल्याचे काम्याने सांगितले. गेल्याच वर्षी 1 एप्रिल 2016 मध्ये प्रत्युषाने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला होता.त्यामुळे येत्या 1 एप्रिलला प्रत्युषाच्या शेवटच्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तिच्या आठवणींनाही उजाळा देण्यात येणार आहे.