मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. 'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रार्थनाने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. अभिनय कौशल्याने तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा फोटो शेअर करण्याबरोबरच प्रार्थना नवीन प्रोजेक्टबाबतही पोस्टमधून माहिती देत असते.
प्रार्थनाने नुकतंच तिचं युट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने लाडक्या बाप्पाचा व्हिडिओ युट्यूबवरुन शेअर केला होता. या व्हिडिओमधून प्रार्थनाने एक प्रसंग शेअर केला आहे. प्रार्थना म्हणाली, "तेव्हा मी कॉलेजमध्ये असेन. संध्याकाळची वेळ होती आणि बाबा थकलेले दिसत होते. पण, त्यांना काय होतंय हे कळत नव्हतं. अचानक बोलता बोलता बाबांनी डोळे वर केले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. मी आणि आई जोरजोरात ओरडत होतो. काय होतंय ते आम्हाला कळत नव्हतं."
"वाट आता वेगळी आहे...", असं का म्हणतेय शिवानी रांगोळे? पाहा व्हिडिओ
"आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच एक डॉक्टर राहायचे. मी लगेच पळत त्यांच्याकडे गेले. पण, रविवार असल्याने ते नव्हते. आमच्याच बिल्डिंगच्या आवारात डॉक्टरांकडे काम करणारा कमपाऊंडर राहायचा. मी त्यांना बघायला गेले, पण तेदेखील नव्हते. आमच्याच बिल्डिंगमधील एक मुलगी डॉक्टरचं शिक्षण घेत होती. तोपर्यंत ती घरी आली होती. माझ्या बाबांचे ठोके सापडत नसल्याचं तिने सांगितलं. काय करावं ते मला समजत नव्हतं. मी मंदिरात जाऊन गणपती बाप्पासमोर बसले आणि मोठ्याने अथर्वशीर्ष म्हणायला लागले. जोपर्यंत बाबांना बरं वाटत नाही, तोपर्यंत मी हे म्हणत राहणार असं मी बाप्पाला म्हणाले. त्यानंतर काही वेळाने माझे वडील शुद्धित आल्याचं माझ्या मैत्रिणीने सांगितलं. माझ्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं,"असंही प्रार्थनाने सांगितलं.
लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नाला श्रद्धा कपूरने दिलं उत्तर, म्हणाली, "शेजारच्या काकू..."
आयुष्यातील हा भावनिक प्रसंग सांगताना प्रार्थनाला अश्रू अनावर झाले. पुढे ती म्हणाली, "मोठ्याने बोलल्याने मला श्वास लागला होता. मला जोरात खोकला लागला आणि त्यानंतर १५ मिनिटे मी उलट्या करत होते. आई माझ्या बाबांबरोबर रुग्णालयात गेली. पण, त्या प्रसंगानंतर बाप्पा माझ्या जवळ आहे असं मला वाटतं. मी कोणतीही गोष्ट मनापासून मागितली की ती मला मिळते."