'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम या लोकप्रिय मराठी शो चे जज अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांनी हात जोडत जाहीररित्या सोशल मीडियावर माफी मागितली आहे. प्रसादने इन्स्टाग्रामवर तसा फोटो शेअर केला आहे. दोघांवर माफी मागण्याची वेळ आली असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर याचंही स्पष्टीकरण प्रसादने दिलं आहे.
अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून लोकप्रिय झाली. वनिता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर चारच दिवसात ती कामावर परतली. दरम्यान वनिताच्या लग्नात हास्यजत्रा शोचे जज प्रसाद ओक आणि सई ताम्हणकरच उपस्थित नव्हते. प्रसादने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत लिहिले, 'वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळे मी , सई आणि अमित फाळके जाहीर माफी मागतो.' या कॅप्शनसोबत त्याने हात जोडून माफी मागतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
प्रसाद आणि सईच्या माफीनंतर वनितानेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रसादची स्टोरी रिपोस्ट करत वनिता म्हणते, 'गिफ्ट दिल्याशिवाय माफी मिळणार नाही असं तिने म्हणलं आहे.'
अभिनेत्री वनिता खरातने २ फेब्रुवारी रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधली. ठाण्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकार लग्नात सामील झाले होते.