Join us

​प्रशांत दामले करणार खाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 11:26 AM

प्रशांत दामले हे आज मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी छोेट्या पडद्यावर देखील काम केले आहे. ...

प्रशांत दामले हे आज मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी छोेट्या पडद्यावर देखील काम केले आहे. चंद्रकांत चिपळूणकर सिढी बम्बावाला हिंदी मालिकेत देखील प्रशांत दामले यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचे कौतुक समीक्षक, प्रेक्षक नेहमीच करत असतात. आता प्रेक्षकांना ते एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. खाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात ते सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहेत.खाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोमध्ये प्रशांत दामले आपल्याला एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. या प्रोमोमध्ये ते नवी चव नवी फिल असे म्हणताना आपल्याला दिसत आहेत. कलर्स मराठी या वाहिनीवर त्यांचा हा कार्यक्रम सुरू होणार असून या कार्यक्रमासाठी ते खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. २५ ऑगस्टपासून खाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून दुपारच्या वेळात प्रेक्षकांना तो पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशांत दामले यांनी चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना विविध पाककृती पाहायला मिळणार आहेत.प्रशांत दामले यांनी याआधी देखील अशा प्रकारच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्यामुळे प्रेक्षकांना प्रशांत दामले या कार्यक्रमात देखील प्रेक्षकांना आवडतील अशी सगळ्यांना खात्री आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना विविध प्रकारच्या प्रांतातील पाककृती पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा अनुभव असणार आहे.