Join us

प्रथमेश लघाटे... तेव्हाचा आणि आत्ताचा! गायकानं केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:48 IST

Prathamesh Laghate : प्रथमेश लघाटेने एका मुलाखतीत त्याच्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितले

सारेगमप लिटिल चॅम्पस (Sa Re Ga Ma Pa Little Champs) मराठीचं पहिलं पर्व खूप गाजलं होतं. पहिल्या पर्वातील रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या सर्वांना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. या पंचरत्नांनी सुरेल आवाजानं सर्वांची मनं जिंकली. या पंचरत्नापैकी मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर नुकतीच प्रेमाची कबुली दिली आणि ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रथमेशने त्याच्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितले.

प्रथमेश लघाटेने त्याच्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितले की, मी डाएट १००% पाळतो आणि माझं डाएट आयुर्वेदिक पद्धतीचं आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या अशा दोन व्याख्या आहेत. त्यानुसार मी माझ्या आहारात बदल करतो. मी मैदा खाणं बंद केलं आहे आणि रात्री उशिरा जेवणंही मी बंद केलं आहे. कधी कधी आमच्या गाण्याच्या कार्यक्रमांमुळे आम्हाला रात्री उशीर होतो आणि गायल्यामुळे चांगलीच भूक लागते. अशावेळी मी उपमा किंवा खिचडी असं हलकं काहीतरी खातो.

माझ्यासारखेच डाएट मुग्धाही करते फॉलो

पुढे तो म्हणाला, मी कधीच जिम वगैरे लावलेली नाही. मी पारंपारिक पद्धतीने व्यायाम करतो आणि तो मी दररोज करतो. सूर्यनमस्कार, दोरी उड्या, चालणं आणि प्राणायाम हा व्यायाम मी करतो. माझा एक भाऊ एमडी आयुर्वेद आहे. त्याने मला हे सगळे प्लान करून दिले आहे. तर माझ्यासारखेच डाएट मुग्धाही फॉलो करते.