Join us

माझी तुझी रेशमीगाठ..! प्रार्थना बेहरेच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केला पतीसोबतचा रोमँटिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 1:29 PM

Prarthana Behere : प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सध्या माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत तिने साकारलेली नेहा रसिकांना खूप भावते आहे. तसेच प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते आणि पोस्टमुळे ती चर्चेत असते. दरम्यान तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे तिने व्हिडीओ शेअर करत तिचा नवरा अभिषेक जावकर(Abhishek Jawkar)ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर अभिषेक जावकर सोबतचे काही खास क्षणांचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आनंदी ५. या व्हिडीओत प्रार्थना अभिषेकसमोर नाचताना दिसते आहे. तसेच मस्ती करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटी शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रार्थना नेहमी अभिषेकसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. 

प्रार्थना बेहरे हिने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज असून तिने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. 

अभिषेक जावकरने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची निर्मितीसंस्था सुरु केली. डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे