शेमारू मराठीबाणावरील मालिका ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’(Jogeshwaricha Pati Bhairavnath)मध्ये भैरवनाथाची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक निकम(Pratik Nikam)ने अलीकडे सेटवर चाहत्यासोबतचा घडलेला एक गोड क्षण शेअर केला. भैरवनाथाच्या भूमिकेतले रूप आणि त्यांची व्यतिरेखा साकारतानाचा प्रतीक लोकांना कसा आवडतो याबद्दल त्याने सांगितले. प्रतीक प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे.
प्रतीक निकमने अलीकडेच एका चाहत्यासोबत आलेल्या हृदयस्पर्शी अनुभवाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा आमचे चाहते आम्हाला सेटवर भेटायला येतात, जे नेहमीच आनंददायी असते. एकदा, आमची मालिका पाहणारा एक चाहता आला आणि बोलत असताना त्याने खरोखर हृदयस्पर्शी गोष्ट शेअर केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात मी साकारत असलेल्या भैरवनाथाच्या रूपात असलेला माझा फोटो आहे. ते ऐकूनच मी आनंदाने चकीत झालो. आपण पडद्यावर जे काही करतो ते आपल्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचे आहे हे जाणून यासारखे सर्व मेहनतीचे क्षण सार्थक ठरतात.”
तो पुढे म्हणाला, "जेव्हा जवळच्या गावातील लोकं माझी प्रशंसा करतात आणि मला त्यांच्या घरी जेवायला बोलावतात तेव्हा मला खूप आनंद होतो. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा मला कृतज्ञतेने भारावून टाकतात. माझे काम लोकांच्या जीवनाला कसे स्पर्श करते आणि त्यांना कसे माझ्या जवळ आणते हे पाहणे अविश्वसनीय आहे."