Join us

'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 5:19 PM

सध्या आशियाई स्पर्धेची सगळीकडेच चर्चा रंगली असून भारताने आतापर्यंत यात २ गोल्ड मेडल जिंकले आहेत. खरंतर गोल्ड मेडल जिंकण्याची ही प्रथा आजची नाहीये ती महाभारत काळापासूनची आहे.

सध्या आशियाई स्पर्धेची सगळीकडेच चर्चा रंगली असून भारताने आतापर्यंत यात ३ गोल्ड मेडल जिंकले आहेत. खरंतर गोल्ड मेडल जिंकण्याची ही प्रथा आजची नाहीये ती 'महाभारत' पासूनची आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. कारण महाभारत मालिकेत भीम ही भूमिका साकारणारा प्रविण कुमार यानेही आशियाई गेम्समध्ये ४ मेडल मिळवले होते. ज्यात दोन गोल्ड, एक सिल्व्हर आणि एका ब्रॉंझ पदकाचा समावेश आहे. सिनेमा आणि मालिकेत येण्याआधी प्रविण कुमार हा एक अॅथलेट होता. 

भारताचा स्टार खेळाडू

प्रविण कुमार हा १९६० आणि १९७० मध्ये भारतातील स्टार खेळाडू होता. आपल्या उंचीमुळे अनेक वर्ष त्याने हॅमर थ्रो आणि डिस्कस थ्रो स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. १९६६ आणि १९७० मध्ये बॅंकॉकमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धत प्रविणने डिस्कस थ्रोमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकले होते. १९६६ मध्ये हॅमर थ्रोमध्ये त्याने ब्रांँझ पदक मिळवलं होतं. 

१९७४ मध्ये तेहरानमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत प्रविणने डिस्कस थ्रोमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलं होतं. तर १९७२ मध्ये झालेल्या समर ऑलंम्पिकमध्ये त्याने भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 

अभिनयाला सुरुवात

१९८१ मध्ये प्रविण कुमार याने सिनेमात काम करायला सुरुवात केली. त्याचा पहिला सिनेमा रक्षा हा होता. याचवर्षी त्याला दुसरा मेरी आवाज हा सिनेमा मिळाला होता. यात जितेंद्र मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर १९८८ पर्यंत त्यांने ३० पेक्षा जास्क सिनेमात काम केलं. त्यानंतर त्याला बीआर चोप्रा यांनी महाभारत या मालिकेत भीमचा रोल ऑफर केला. 

- प्रविण कुमार हा अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट शहंशाह सिनेमातही दिसला होता. यात त्याने मुख्तार सिंहची भूमिका साकारली होती. 

राजकारणात प्रवेश

- १९८८ पर्यंत सिनेमात आणि मालिकेत काम केल्यानंतर प्रविण कुमार अभिनयापासून दूर गेला. जवळपास १४ वर्षांनी त्याने २०१२ मध्ये धर्मेश तिवारीने दिग्दर्शित केलेल्या भीम सिनेमात काम केलं होतं. पण पुन्हा त्याने अभिनयाला अलविदा केला. 

-  २०१३ मध्ये प्रविण कुमारने आम आदमी पार्टी जॉईन केली होती. दिल्लीतील वजीरपुर परिसरातून तो निवडणुकीलाही उभा होता. पण त्याचा पराभव झाला होता. त्यानंतर त्याने २०१४ मध्ये भापजामध्ये प्रवेश केला.  

टॅग्स :आशियाई क्रीडा स्पर्धासुवर्ण पदक