Join us

क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 09:05 IST

प्रेग्नंसीमध्ये रॅम्प वॉक अन् फ्लॉन्ट केला बेबी बंप, ४१ वर्षीय गौहर खानचा व्हिडिओ समोर

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम गौहर खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. गौहर खानने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन ती प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता गौहर खानने प्रेग्नंन्सीमध्ये चक्क रॅम्पवॉक केला आहे. एका इव्हेंटमधील गौहर खानचा व्हिडिओ समोर आला आहे.  

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन गौहर खानचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ४१ वर्षीय गौहर खान रॅम्प वॉक करताना दिसत आहे. प्रेग्नंट गौहर खानला हाय हिल्स घालून रॅम्प वॉक करताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. अभिनेत्रीने रॅम्प वॉक करताना तिचा क्यूट बेबी बंपही फ्लॉन्ट केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. गौहर खानच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी गौहर खानने जैद दरबारसोबत निकाह केला होता. त्यानंतर २०२३ साली तिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आता पुन्हा ती आई होणार आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी गौहर आणि जैद उत्सुक आहेत. 

टॅग्स :गौहर खानटिव्ही कलाकारप्रेग्नंसी