Join us

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतल्या अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:19 IST

अलिकडेच देवमाणूस फेम किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर आणि शिवा फेम शाल्व किंजवडेकर-श्रेया डफाळपूरकर यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे.

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. अलिकडेच देवमाणूस फेम किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर (Kiran Gaikwad-Vaishnavi Kalyankar)आणि शिवा फेम शाल्व किंजवडेकर-श्रेया डफाळपूरकर (Shalva Kinjwadekar-Shreya Dafalapurkar) यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. हा अभिनेता म्हणजे प्रेमाची गोष्ट मालिकेत मिहीरची भूमिका साकारणारा अभिनेता राजस सुळे (Rajas Sule) याने त्याची गर्लफ्रेंड चैत्राली पितळे(Chaitrali Pitale)सोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत मिहीरची भूमिका अभिनेता राजस सुळेने साकारली आहे. या मालिकेतील त्याच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान नुकताच तो विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड चैत्राली पितळेसोबत सात फेरे घेतले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

लग्नात विधीवेळी राजसने बेज रंगाची भरजरी पेशवाई शेरवानी परिधान केलेली दिसत आहे. डोक्याला फेटा आणि मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहे. तर त्याची पत्नी चैत्रालीने पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेली दिसते आहे. नंतर रिसेप्शनसाठी त्याने डार्क जांभळ्या रंगाची वर्क असलेली जोधपुरी कोट आणि पॅण्ट घातली होती. तर त्याच्या पत्नीने वाइन रंगाची वेलवेटची हेवी वर्क असलेली साडी परिधान केलेली दिसते आहे. चाहते त्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

राजस आणि चैत्राली कॉलेजफ्रेंड असून ते दोघे गेल्या ८ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अखेर २०२४मध्ये त्या दोघांनी लग्न केले. सोशल मीडियावर त्या दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.