मराठी म्हणून जन्माला आल्याचा अभिमान....! प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:04 PM2022-04-02T17:04:14+5:302022-04-02T17:31:42+5:30
सोशल मीडियावर प्राजक्ताची एक पोस्ट चर्चेत आहे. यात तिने आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय.
सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपेकी एक आहे. सोशल मीडियावर तिची एक पोस्ट चर्चेत आहे. यात तिने आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे. ही पोस्ट शेअर करताना प्राजक्ताने चाहत्यांना गुढ पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी म्हणून जन्माला आल्याचा, मराठी संस्कृती मध्ये वाढल्याचा, मराठी जाणतोय-बोलतोय ह्याचा आत्यंतिक अभिमान अशी पोस्ट प्राजक्ताने शेअर केलीय. यासह हिरव्या रंगाच्या साडीतलं फोटो ही तिनं शेअर केली. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते तिला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत.
प्राजक्ता अलीकडेच रिलीज झालेल्या ‘पावनखिंड’ या सिनेमात झळकली. चित्रपटातील तिच्या या भुमिकेचंही चांगलंच कौतुक होतंय.प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत तिनं साकारलेल्या मेघा देसाई या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली.