Join us

प्रथमेश होणार ३५ टक्के काठावर पास...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2016 4:23 AM

              सचिन तेंडुलकर, मुकेशअंबानी, अझीम प्रेमजी,एेश्वर्या राय, मेरी कोम,सलमान खान, स्मृती इराणी,अक्षय कुमार ही ...

              सचिन तेंडुलकर, मुकेशअंबानी, अझीम प्रेमजी,एेश्वर्या राय, मेरी कोम,सलमान खान, स्मृती इराणी,अक्षय कुमार ही नावं आपल्यासाठी नवीन नाहीत. पण तुम्हाला हे ठावूक आहे का ? यातील बहुतेक मंडळी ही शाळा- कॉलेजातून अपेक्षित असे यश मिळवू शकलेली नव्हती.एवढेच काय, या अवलीयांपैकी अनेकांच्या यशाची सुरूवात शाळेत वा कॉलेजमधे मिळालेल्या 35% सोबत  झाली होती.                 तेच 'पस्तीस टक्के' ज्यांनी या लोकांना त्यांना जेआवडतं ते करण्याची संधी दिली. त्यामुळे ते आज जे काही आहेत ती याच 35% किमया मानवी लागेल. जशी या सर्वांची पस्तीस टक्क्यांची वेगवेगळी गोष्ट आहे, तशी एका अशाच पस्तीस टक्क्यांचा मानकरी असलेल्या मुलाची गोष्ट आपल्या भेटीला येतेय आगामी '35% काठावर पास' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. कॉलेजमध्ये 35% मिळवणारा हा  'गुणवंत विद्यार्थी' मिळणाऱ्या मार्कांच्या पलीकडे जाऊन काय धमाल करतो. तसेच निकालात मिळणाऱ्या टक्क्यांच्या पलीकडल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीवर आपले लक्ष वेधून घेताना त्याच्या आयुष्यात येणारे यू टर्न, प्रेम..परीक्षा..आणि त्यातून तयार होणारे प्रॉब्लेम्स यांची मोट लेखकाने अगदी मजबूत रित्या बांधलेली आहे.                                 चित्रपटाच्या नावाइतकाच हटके आणि लोकप्रीय असलेला महाराष्ट्राचा लाडका 'दगडू' म्हणजेच प्रथमेश परब या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारतो आहे. बालक पालक या रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटात आपण पाहिलेला 'विशू' आणि त्यानंतर आलेल्या टाईमपास आणि टाईमपास 2 मधील 'दगडू शांताराम परब' या दोन्ही गाजलेल्या भूमिका साकारताना दिसलेला प्रथमेश येत्या 35% काठावर पास मध्ये एक नव्या धाटणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सेजल शिंदे फिल्म्स आणि 52 फ्रायडे सिनेमाज हे सादरकर्ते असलेला ह्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सतीश मोतलिंग यांचे आहे. प्रियतमा या मराठी चित्रपटानंतर मोतलिंग या नव्या जॉनरचा विषय हाताळताना दिसतील. टाईमपास आणि टाईमपास 2 च्या घवघवीत यशानंतर प्रथमेश '35 टक्क्यांच्या' निमित्तानेपुन्हा एकदा जोरदार               फटकेबाजी करण्यास सज्ज असल्याचे समजते, त्यामुळे 35 टक्क्यांची ही गोष्ट बॉक्स ऑफिसवर नक्कीच 100% यशस्वी होणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल...!