Join us

लग्नाला होकार देण्याआधी प्राजक्ता वायकुळनं विचारला होता एक प्रश्न, पृथ्वीक प्रतापच्या उत्तराने जिंकलं मन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 2:00 PM

प्राजक्ताने पृथ्वीकला लग्नासाठी होकार का दिला, याचे कारण सांगितलं.

Prithvik Pratap and Prajakta Waikul : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya jatra) या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीक प्रताप चांगलाच चर्चेत आहे. कारण आहे पृथ्वीकचं लग्न. अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. २५ ऑक्टोबरच्या दिवशी पृथ्वीक लग्नबंधनात अडकला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता नुकतेच एका मुलाखतीमध्ये पृथ्वीक आणि प्राजक्ताने त्यांची लव्हस्टोरी सांगितली.

 पृथ्वीक आणि प्राजक्ता यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी प्राजक्ताने पृथ्वीकला लग्नासाठी होकार का दिला, याचे कारण सांगितलं. पृथ्वीकच्या आईशी भेटल्यानंतर प्राजक्ताने त्याला एक प्रश्न विचारला होता की  "जर कधी तुला तुझी आई आणि मी यातील एकाला निवडण्याची वेळ आली, तर तू कुणाला निवडशील?" यावर पृथ्वीकने दिलेल्या उत्तराने प्राजक्ताचं मन जिंकलं.

प्राजक्ताच्या या कठीण प्रश्नावर पृथ्वीकने उत्तर दिलं होतं की, "दोघींमधून एकाला निवडणं कठीण आहे. तू प्रश्न फार अवघड विचारलाय. मी तिला म्हटलं सगळं मान्य आहे, पण आईला नाही सोडणार. एकवेळेस आपण आपलं नातं संपवू. जर आई प्रॉब्लेम वाटत असेल, तर एक वेळी आपण आपलं नातं थांबवू, कारण बाहेरुन तुला ती प्रॉब्लेम वाटत असेल, पण ती माझ्यासाठी कधीच प्रॉब्लेम नाही. मी आयुष्यभर आईसोबत राहीन". पृथ्वीकचं उत्तर ऐकून प्राजक्ताने त्याला लग्नासाठी होकार दिला. प्राजक्ता म्हणाली, "जर तो माझ्यासाठी आईला नाही सोडत आहे, तर नक्कीच तो इतर कुणासाठी मला नाही सोडणार".

टॅग्स :पृथ्वीक प्रतापटिव्ही कलाकारमराठी अभिनेता