Join us

प्रिया भट्टाचार्य आणि बाबुल सुप्रियो रमले ‘कसौटी जिंदगी के’च्या आठवणीत,लवकरच दुसरा सिझन भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:55 IST

नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे.

‘कसौटी जिंदगी के’ ही मालिका त्यातील रोमँटिक टायटल ट्रॅकही अधिक लोकप्रिय ठरले होते. ही मालिका संपून अनेक वर्षे लोटली असली, तरी तिचे शीर्षक गीत आजही रसिकांच्या मनात कायम आहे.विशेष म्हणजे “चाहत के सफर में, दिलों के हौसले देखो…” बाबुल सुप्रियो आणि प्रिया भट्टाचार्य या गायकांनी गायले होते. आता पुन्हा त्याच उत्साहात  18 वर्षांनंतर त्यांनी ‘कसौटी जिंदगी के वापसी’ हे गीत पुन्हा तितक्याच उत्साहाने गायले आहे.

या मालिकेसाठी पुन्हा गाताना  बाबुल सुप्रियो 18 वर्षाआधीच्या आठवणीत रमला.यावेळी बाबुल सुप्रियोने सांगितले की, “ही मालिका पुन्हा नवीन ढंगात नवीन स्वरूपात आणल्यामुळे पुन्हा घराघरांत हे सुर गुंजणार आहेत. त्यामुळे पुन्हा सगळ्यांनाच एक चांगली मनोरंजनाची पर्वणी मिळणार असल्यामुळे मी बालाजी टेलिफिल्म्सचे आभार मानतो. या मालिकेसाठी पुन्हा गीत गाताना माझ्या मनात पूर्वीच्या असंख्य आठवणींनी गर्दी केली होती आणि मला पुन्हा एकदा तशीच संधी मिळत असल्यामुळे मी खूपच आनंदित झालो होतो. ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेचा गाभा त्याच्या शीर्षकगीतात पुरेपूर उतरला आहे. हे गीत केवळ भारतातच लोकप्रिय झालं असं नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांनी “चाहत के सफर में…” या शीर्षकगीतावर भरभरून प्रेम केलं. या नव्या मालिकेशी संबंधित सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि ही नवी मालिका मूळ मालिके इतकीच ऐतिहासिक ठरो, अशी इच्छा व्यक्त करतो. यातील नव्या कलाकारांना पूर्वीच्या कलाकारांइतकेच प्रेम आणि लोकप्रियता लाभू दे हीच आशा करतो.”

सप्टेंबर महिन्यात 'कसौटी जिंदगी की- २' हा शो रसिकांच्या भेटीला येईल.. सात वर्षांनंतर एकता कपूर हा शो नव्या स्टारकास्टसह पुन्हा एकदा रसिकांसाठी घेऊन येत आहे. नुकतेच  ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.आजही उर्वशी ढोलकियला पाहाताच कोमोलिका ही इमेज रसिक विसरलेले नाहीत. इतक्या वर्षानंतरही कोमोलिकाची जादु कायम असल्याचे वारंवार पाहायला मिळते. मात्र आता कसौटी जिंदगी 2मध्ये आता नव्या स्टारकास्टनुसार कलाकारांची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत गाजलेले निगेटीव्ह कॅरेक्टर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान झळकणार असल्याचे बोलले जात आहे. श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  ऐरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे. नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे.