Join us

​अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रेला येतायेत प्रचाराच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2017 7:14 AM

भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा सुरुवातीच्या काळात शिल्पा शिंदे साकारत होती. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर मालिकेच्या ...

भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा सुरुवातीच्या काळात शिल्पा शिंदे साकारत होती. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर मालिकेच्या टिआरपीवर त्याचा परिणाम होईल असे अनेकांना वाटले होते. पण तिने मालिका सोडल्यानंतर तिची जागा शुभांगी अत्रेने घेतली. शुभांगीने कसोटी जिंदगी की, कस्तुरी, चिडिया घर यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. शुभांगी एक खूप चांगली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि आता शुभांगीच प्रेक्षकांना अंगुरी भाभी म्हणून आवडायला लागली आहे.अंगुरी भाभी या व्यक्तिरेखेमुळे शुभांगीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. तिच्या लोकप्रियतेचा विचार करून तिला अनेक राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या ऑफर्स येत आहेत. भाभीजी घर पर है या मालिकेत ती कानपूरमध्ये राहाणाऱ्या एका स्त्रीची व्यक्तिरेखा साकारत असल्याने अनेकजण ती मुळची उत्तर प्रदेशचीच असल्याचे मानतात. त्यामुळे तिला उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष खूप सारे पैसे देण्यासाठी तयार आहेत. याविषयी शुभांगी सांगते, "मला प्रचार करण्यासाठी सध्या अनेक राजकीय पक्षांकडून विचारले जात आहे. पण मी अद्याप कोणाचा प्रचार करायचा की नाही याबाबत विचार केलेला नाही. जर प्रचार करायचा असे मी ठरवले तर मी सर्वात आधी सगळ्या राजकीय पक्षांचा अभ्यास करेन, मला जे योग्य वाटतील त्यांचाच मी प्रचार करेन. तसेच कोणत्याही एका व्यक्तीचा अथवा पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायला मला अधिक आवडेल. आपल्या देशात मतदानाचा आकडा खूपच कमी आहे. लोक मतदानाच्या दिवशी सुट्ट्या काढून फिरायला जातात. त्यामुळे मला मतदानाविषयी जनजागृती करायला आवडेल. तसेच तुम्हाला जर कोणाला मत द्यायचे नसेल तर तुम्ही नोटा या पर्यायाचा वापर करू शकतादेखील हे अनकेजणांना माहीत नाहीये. त्याबाबत लोकांना माहिती द्यायला मला नक्की आवडेल."