Join us

​स्वामी रामदेव यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट : नमन जैन ; ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ची टीम ‘लोकमत’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 9:22 AM

अभिनेता अजय देवगण आणि अभिनव शुक्ला निर्मित ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ ही नवी कोरी मालिका ‘डिस्कव्हरी जीत’ या ...

अभिनेता अजय देवगण आणि अभिनव शुक्ला निर्मित ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ ही नवी कोरी मालिका ‘डिस्कव्हरी जीत’ या वाहिनीवर येत्या १२ फेब्रुवारीपासून येत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त बालकलाकार नमन जैन यात रामकिशनची  (बाबा रामदेव यांच्या बालपणीची भूमिका) भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू गोवर्धन महाराजांचे पात्र साकारणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने नमन आणि तेज सप्रू यांनी अलीकडे लोकमतच्या नागपूर कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी लोकमत सीएनएक्स मस्तीच्या टीमशी दिलखुलास गप्पा मारल्या.रामदेव बाबांची संघर्ष कथा दाखवणाºया या मालिकेत मला काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी आनंदाची क्षण आहे. त्यातही बाबा रामदेव यांच्या बालपणीची भूमिका माझ्या वाट्याला येणे, हा अभिमानाचा क्षण आहे, असे नमन यावेळी म्हणाला. रामदेव बाबा लहान असताना त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. हा संघर्ष मी पडद्यावर साकारला आहे. लोकांना माझा अभिनय आवडेल, अशी अपेक्षा आहे, असे त्याने सांगितले.‘चिल्लर पार्टी’,‘रांझणा’ या चित्रपटात नमन बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेला आहे. ‘रांझणा’मध्ये त्याने छोट्या धनुषची भूमिका साकारली होती.यावेळी तेज सप्रू हेही आपल्या भूमिकेबद्दल भरभरून बोलले. ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ हा बाबा रामदेव यांच्या आयुष्यपट उलगडून दाखवणारा एक भव्यदिव्य शो आहे. मी या प्रयत्नांचा भाग असणे, माझे भाग्य आहे. हा नवा शो लोकांना आवडेल, हा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले.