Join us  

राया आणि मंजिरीने केला 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, विशाल निकमच्या राऊडी स्टाइलने लावले चार चांद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 1:51 PM

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत विशाल राया तर पूजा मंजिरीच्या भूमिकेत आहे. या ऑनस्क्रीन जोडीने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

'पुष्पा २' सिनेमातील अंगारो सा गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'अंगारो सा' गाण्यावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. बॉलिवूडबरोबरच मराठी कलाकारांनीही 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. आता येड लागलं प्रेमाचं मालिकेतील राया आणि मंजिरीही या गाण्यावर थिरकले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवर 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतून विशाल निकम आणि पूजा बिरारी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत विशाल राया तर पूजा मंजिरीच्या भूमिकेत आहे. या ऑनस्क्रीन जोडीने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओत विशाल आणि पूजा 'अंगारो सा' गाण्याच्या हूक स्टेप्स करताना दिसत आहे. "फायर है हम, समझा क्या?" असं कॅप्शन पूजाने या व्हिडिओला दिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी पूजा आणि विशालचं कौतुक केलं आहे.

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारीसह नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, जय दुधाणे, प्राजक्ता ननावले, रिद्धी सोमनाथ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी आणि त्यांची कॅट फाईटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच टीआरपीच्या शर्यतीत आहे. 

टॅग्स :विशाल निकमटिव्ही कलाकारपुष्पामराठी अभिनेता