Join us  

जाऊबाई जोरात! 'पुन्हा कर्तव्य आहे'मधील वसुंधरा आणि अवनीचा 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:04 PM

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या गाण्याच्या फ्युजनवर वसुंधरा आणि अवनी यांनी डान्स केला आहे.  

'पुष्पा २' सिनेमातील अंगारो सा गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'अंगारो सा' गाण्यावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. बॉलिवूडबरोबरच मराठी कलाकारांनीही 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. आता 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. 

'पुन्हा कर्तव्य आहे' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील वसुंधरा आणि अवनी यांनी अंगारो सा गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या गाण्याच्या फ्युजनवर वसुंधरा आणि अवनी यांनी डान्स केला आहे. पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर वसुंधरा हे पात्र साकारत आहे. तर शुभांगी सदावर्ते अवनीच्या भूमिकेत आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या दोघी गाण्याची हुकस्टेप करताना दिसत आहेत. 

दरम्यान, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नुकतंच वसुंधरा आणि आकाश यांचं लग्न पार पडलं आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. आकाश आणि वसुंधराने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ठाकूर घराण्यात सामावून घेताना आणि चिनू मिनूला सांभाळताना वसुंधराची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठीपुष्पा