Join us  

पूर्वा कौशिकने सांगितला साडीमध्ये फाईट करण्याचा अनुभव, म्हणाली - असा क्षण कलाकाराच्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:08 PM

Purva Kaushik : शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने साडीमधील फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केलाय.

'शिवा' (Shiva Serial) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे.  शिवाची स्टाईल घराघरात प्रसिद्ध झाली आहे मग तो शिवाचा शर्ट-पॅन्ट आणि बॉयकट असो किंवा लग्नानंतरचा साडीतील लूक असो. आता काय तर शिवाची साडीमध्ये फाईट सीनची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक(Purva Kaushik)ने साडीमधील फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केलाय.

पूर्वा कौशिक सांगते की, "साडीमध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खूप कमाल होता. मी आयुष्यात पूर्वा म्हणून हे करीन असं मला कधीच वाटलं नव्हते. पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मला हे सर्व करायला मिळालं याबद्दल खरंच आनंद आहे. तशी मालिकेत शर्ट-पॅन्ट मध्ये छोट्या-मोट्या मारामाऱ्या केल्यात, पण जेव्हा साडीमध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरु झाली तेव्हा थोडे दडपण आले होते. कारण ते टीव्ही स्क्रीनवर प्रभावी आणि परिणामकारक दिसले पाहिजे. माझ्यात ते हावभाव, देहबोली त्या पोशाखानुसार योग्य येईल का याचे टेंशन आले होते. जेव्हा हा सीन करायला केली तो अनुभव अविश्वसनीय होता. 

पुढे ती म्हणाली की, कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या प्रवासात माईलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला आहे. फाईट सीनच शूटिंग होतं असताना फाईट मास्टरचे  मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट करत होतो. मला आधी वाटलं होतं की मी हे साडीत आणि हिल्सच्या सॅण्डलवर हे पेलवू शकीन का, शिवा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करत आहे तर ती कशी दिसेल आणि ते अगदी जस हवं होतं तसंच झालं. मला तर हार्नेसची खूप गंमत वाटत होती. खरं सांगायच झाले तर जास्त सराव नाही करावा लागला आणि मार्गदर्शन करणारी माणसं ही उत्तम होती. 

टॅग्स :झी मराठी