Join us  

​बिग बॉसच्या फॅन्सना बसणार आता हा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2016 2:06 PM

बिग बॉसचे हे पर्व आतापर्यंतच्या सगळ्या पर्वांपेक्षा वेगळे आहे. बिग बॉसच्या आतापर्यंतच्या नऊ पर्वांमध्ये केवळ सेलिब्रेटी आपल्याला पाहायला मिळाले ...

बिग बॉसचे हे पर्व आतापर्यंतच्या सगळ्या पर्वांपेक्षा वेगळे आहे. बिग बॉसच्या आतापर्यंतच्या नऊ पर्वांमध्ये केवळ सेलिब्रेटी आपल्याला पाहायला मिळाले होते. पण यंदाच्या पर्वात सेलिब्रेंटीसोबत आपल्याला सामान्य लोकही पाहायला मिळत आहेत. सामान्य लोकांना घरात प्रवेश देण्यासाठी खास ऑडिशनही या मालिकेच्या टीमने घेतले होते. या कार्यक्रमात सुरुवातीला इंडियावाले आणि सेलिब्रेटी असे दोन गट पाहायला मिळाले होते. तसेच या कार्यक्रमात सेलिब्रेटी हे सेवक तर इंडियावाले हे मालक होते. तसेच घरात कोणी कशाप्रकारे वागायचे याची नियमावलीदेखील एका पुस्तकात लिहिण्यात आली होती. लोकांनादेखील कार्यक्रमाचा हा नवा फॉरमॅट खूप आवडत आहे. सेलिब्रेटींप्रमाणे सामान्य लोकांनाही या कार्यक्रमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. पण या कार्यक्रमाच्या फॅन्सना एक आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या कार्यक्रमातील नियमावलीचे पुस्तक आता बिग बॉस जाळणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमात इंडियावाले आणि सेलिब्रेटी असे दोन गट राहाणार नाहीत. आता गटानुसार नाही तर प्रत्येकजण वैयक्तिकरित्या हा खेळ खेळणार आहे. तसेच कोणी कोणाचा सेवक तसेच कोणी कोणाचा मालक नसणार आहे. तसेच आता या स्पर्धकांमधून एका कॅप्टनची निवड केली जाणार आहे.बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सगळ्याच भागांमध्ये दर आठवड्याला एका कॅप्टनची निवड केली जात असे आणि तो कॅप्टन आठवडाभर त्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा सदस्य असे. पण बिग बॉस 10च्या पर्वात सुरुवातीच्या भागात कोणीही कॅप्टन नव्हता. पण आता प्रेक्षकांना दर आठवड्याला कॅप्टन पाहायला मिळणार आहे.