अभिनेता आर. माधवन नुकताच अॅमेझॉन प्राईमवरील वेब सीरिज ब्रीदमध्ये दिसला होता. ही सीरीज मानसिक नाट्यावर आधारित होती. माधवनने यात मुख्य भूमिका केली होती. आता तो मेगा आयकॉन्स सीरिजचे सूत्रसंचालन करणार आहे. अभिनेता आर. माधवन लवकरच नॅशनल जिओग्राफिकच्या आगामी सीरिज 'मेगा आयकॉन्स'चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ही सीरिज देशातील प्रसिद्ध लोकांवर आधारित आहे.
मेगा आयकॉन्स या शोमध्ये वेगळ्या क्षेत्रातील काही प्रभावी लोकांविषयी सांगण्यात येणार आहे. यात पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, आध्यात्मिक गुरू आणि नोबेल पुरस्कार विजेता दलाई लामा, भारताची पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता कमल हसनसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये प्रसारीत होणाऱ्या या शोच्या प्रीमियरमध्ये विराट कोहलीचा जीवनपट दाखवण्यात येईल. प्रत्येक भागात या पाच दिग्गजांच्या जीवनाविषयी दाखवण्यात येईल. या सीरिजमध्ये माधवन काही तज्ज्ञांची मदतदेखील घेणार आहे. या दिग्गजांनी कसे ध्येय गाठले, त्यांनी कशी मेहनत घेतली, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, हे सर्व ते सांगणार आहेत. या मालिकेतून या दिग्गजांच्या जीवनाविषयी दाखवण्यात येईल. त्यांनी अनेकांना प्रभावित केले.याविषयी माधवन म्हणाले, आपण विराटच्या खेळाचा आनंद घेत असतो. पडद्यावर कमल हसनचा अभिनयदेखील पाहतो. या लोकांना पाहत असताना, हे लोक इतके महान कसे झाले, असा विचारही येतो. खरचं महान होण्यासाठीच या लोकांचा जन्म झाला होता का ? त्यांचे यश पहिल्या दिवसांपसूनच ठरले होते का ? आम्ही या मालिकेतून त्यांच्या जीवनाला सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी चॅनलसोबत काम करण्यास उत्सुक आहे. कोणत्या गोष्टीमुळे हे दिग्गज महान झाले, याविषयी सांगणार आहे.