Join us

मल्लिका सिंहला मुंबई आणि गुजरात प्रवासाची कसरत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 15:55 IST

'राधाकृष्ण’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे या मालिकेचा समावेश आता टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय 10 मालिकांमध्ये झाला आहे.

कलाकारांचे जीवन सुखासीन कधीच नसते कारण चित्रीकरणाचे वेळापत्रक प्रदीर्घ असते आणि सेट ते घर असा दीर्घ प्रवासही करणे गरजेचे असते. पण अभिनय करता करता एखादा कलाकार कॉलेजात पदवीचे शिक्षणही घेत असेल, तर त्याचे जीवन अधिकच दुष्कर होते. ‘राधाकृष्ण’ मालिकेत राधेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मल्लिका सिंह ही अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक आहे. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला मुंबई आणि गुजरात असा वारंवार प्रवास करावा लागतो.

'राधाकृष्ण’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे या मालिकेचा समावेश आता टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय 10 मालिकांमध्ये झाला आहे. पण मल्लिका ही बोरिवलीतील एका कॉलेजातून पदवीचे शिक्षण घेत असून त्या कॉलेजात हजर राहण्यासाठी तिला गुजरातमधून मुंबईत वारंवार यावे लागते. 

आपल्या या प्रवासावर मल्लिका म्हणाली, “मी अभिनयाच्या क्षेत्रात माझी कारकीर्द उभी करीत असले, तरी मी निदान माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, असा माझ्या आईचा आग्रह आहे. त्यामुळे गुजरात ते मुंबई असा संघर्ष मला करावा लागणार, याची मला पहिल्या दिवसापासूनच कल्पना होती. पण आठवड्यातील काही दिवस तरी मला कॉलेजात उपस्थित राहणं आवश्यक आहे. चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकातून मला कॉलेजात उपस्थित राहण्यासाठी तसंच अभ्यासासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचा मनाचा मोठेपणा माझ्या निर्मात्यांनी दाखविला आहे.”