Join us

अखेर राधा सागरच्या बाळाचा पहिला फोटो आला समोर; अभिनेत्रीने दाखवली चिमुकल्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:17 PM

Radha sagar: 'माझा बाप्पा किती गोड दिसतो', असं कॅप्शन देत तिने तिच्या लाडक्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. राधाने १० सप्टेंबर रोजी एका गोड बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे राधा तिच्या प्रेग्नंसीच्या काळात प्रचंड चर्चेत आली होती. यात खासकरुन तिचं डोहाळजेवण आणि मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं. राधाने बाळाला जन्म दिल्यानंतर प्रत्येक जण या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहे.  अनेकांनी राधा तिच्या बाळाचा फोटो कधी शेअर करणार असा प्रश्नही विचारला होता. त्यानंतर आता तिने बाळाची पहिली झलक नुकतीच शेअर केली आहे.

राधा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे त्यामुळे प्रेग्नंसी काळातील अनेक व्हिडीओ, फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. यात नुकतीच तिने तिच्या बाळाची पहिली झलकदेखील चाहत्यांना दाखवली आहे. राधाने गणेशोत्सवाचं निमित्त साधत बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

'माझा बाप्पा किती गोड दिसतो', असं कॅप्शन देत तिने तिच्या लाडक्या लेकासोबतचे फोटो कोलाज करुन शेअर केले आहेत. राधाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने बाळाच्या दोन फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. यात पहिला फोटो बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या महिन्याचा आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये बाळाच्या बाजुला गणरायाचं छान चित्र रेखाटण्यात आलं आहे.

दरम्यान,  राधा सागर हिने मराठीसह हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे. अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. राधा काही काळापूर्वी आई कुठे काय करते या मालिकेतही झळकली होती. या मालिकेत तिने अंकिता ही भूमिका साकारली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी