'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या मालिकेत राधिका नवीन अडचणीत सापडली असून ती या प्रसंगातून बाहेर पडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत राधिकाने शेतकऱ्यांना देण्यासाठी जमविलेल्या मदतनिधी बॅगेतून गायब होते. बॅगेत पैशांऐवजी दगड असतात. त्यामुळे राधिकांवरच शेतकरी पैसे चोरल्याचा आरोप करतात. त्यामुळे राधिका व राधिका मसाला कंपनीचे नाव खराब होते. पैसे कुठे गायब झाले, याचा शोध पोलीस घेत असतात. नुकताच प्रसारीत झालेल्या महाएपिसोड भागात सर्व प्रकरणामुळे सगळेजण ऑफिसमधून निघून जातात. गुरूनाथचे बाबा आनंदला कॉल करतात आणि ऑफिसला येण्याबाबत विचारतात. त्यावर आनंद त्यांना घरीच थांबायला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरूनाथ सर्वकाही नॉर्मल असल्यासारखे वागतो. त्यावर त्याचे आई वडील त्याच्यावर वैतागतो.
त्यानंतर राधिका सौमित्रला राधिका मसाले कंपनी विकत घ्यायला सांगते. कारण तिला कामगारांची काळजी वाटत असते. ती त्याला मार्केटमधील परिस्थिती सांगते आणि त्याला सांगते की तिला मार्केटमध्ये आधीसारखा आदर व वागणूक आता मिळणार नाही. त्यावर सौमित्र तिची समजूत घालतो आणि तिला धाडस देतो की तू या परिस्थितीला धैर्याने तोंड दे.
साठे मॅडम राधिकाला कॉल करतात आणि सांगतात की बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला तुझ्यासोबत मीटिंग करायची आहे. गुरूनाथ बोर्ड ऑफ डिरेक्टर्समधील एका मेंबरशी बोलतो. तो त्यांना सीईओ पदासाठी त्याच्या नावाची शिफारस करण्यासाठी सांगतो. तर राधिका ऑफिसमध्ये सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेते. पण ऑफिसमधील कामगार तिला तसे करू नका असे सांगतात व तुम्ही नसाल तर आम्हीदेखील काम करणार नाही, असे सांगतात.
बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये प्रत्येकजण राधिकाला या घोटाळ्यासाठी जबाबदार ठरवितात. पण ती त्यांना दोन दिवस देण्याची विनंती करते. ती सांगते की मला दोन दिवस द्या. या दोन दिवसात मी ही चोरी नसून घोटाळा असल्याचे सिद्ध करते. त्यावर एकमत नसल्यामुळे व्होटिंग केली जाते. त्यात राधिकाला जास्त मते मिळतात आणि राधिकाला दोन दिवसांची मुदत मिळते.राधिका दोन दिवसांत ती चोरी नसून घोटाळा असल्याचे सिद्ध करून दाखवेल की नाही, हे आगामी भागात पाहणे कमालीचे ठरणार आहे.