Join us

धक्कादायक ! 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिका काढणार गुरुनाथची धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 1:37 PM

राधिकाच्या ऑफिसमध्ये ३५ करोड चोरले, तिला त्रास देण्याची एकही संधी चुकवली नाही. राधिकाने मात्र या सगळ्या गोष्टींना अगदी धैर्याने सामंजस्याने तोंड दिलं.

ठळक मुद्देराधिकाच्या प्रेमाचा, विश्वासाचा पदोपदी अपमान केला

असं म्हणतात कि प्रत्येकाला त्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये सुद्धा आता याच गोष्टीची प्रचिती येणार आहे. आपल्या सुस्वभावी आणि सदाचारी बायकोला फसवणारा, तिचा विश्वासघात करणारा गुरुनाथ, जो आजवर त्याच्या अक्कल-हुशारीने आपल्या बायकोला राधिकाला फसवून त्याचं ईप्सित साध्य करत होता. शनाया नावाच्या मुलीसाठी त्याने आपलं घर, संसार, बायको, मुलगा आई-वडील, मित्र सगळ्यांची प्रतारणा केली. राधिकाच्या प्रेमाचा, विश्वासाचा पदोपदी अपमान केला. तिने त्याला सुधारण्याची संधी देऊनही त्याने शनायाशी दुसरं लग्न केलं. 

राधिकाच्या ऑफिसमध्ये ३५ करोड चोरले, तिला त्रास देण्याची एकही संधी चुकवली नाही. राधिकाने मात्र या सगळ्या गोष्टींना अगदी धैर्याने सामंजस्याने तोंड दिलं. पण त्यावरही गुरुनाथने स्मृतिभंशाचं नाटक केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा विश्वासघात केला. आता त्याच्या पापांचा घडा भरलाय. राधिकाने गुरुनाथला बायको म्हणून खूप वेळा समजून घेतलं. पण आता तिच्या संयमाचा बांध फुटला आहे. गुरूने केलेल्या चुकांची, त्याने राधिकाला दिलेल्या मनस्तापाची, त्याने केलेल्या विश्वासघाताची, जाणीव त्याला व्हावी म्हणून राधिका त्याला आता शिक्षा देणार आहे आणि हि शिक्षा राधिकाच नाही तर सगळ्या बायका मिळून गुरुनाथला देणार आहेत. त्याच्यासारख्याच इतर माणसांसाठी जे आपल्या बायकांना फसवतात हि शिक्षा म्हणजे एक वचक ठरेल. 

राधिकाने आजवर सोसलेल्या दुःखांचा, सहन केलेल्या अपमानाचा हि शिक्षा सूड असेल आणि ती दिल्यानंतर राधिका सुरु करेल आपला एक नवा प्रवास. होणाऱ्या त्रासाला निमूटपणे सहन न करता त्यांच्या विरोधात आवाज उठवणं, आपलं अस्तित्व घडवून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या बायकांसाठी राधिकाचा हा निर्णय म्हणजे एक आदर्श असेल.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको