Join us

'संगीत सम्राट पर्व २'चा परीक्षक म्हणून झळकणार राहुल देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:35 AM

पहिल्या पर्वाला उदंड प्रतिसाद मिळाल्यावर झी युवावरील लोकप्रिय म्युजिक रिऍलिटी शो 'संगीत सम्राट पर्व' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी ...

पहिल्या पर्वाला उदंड प्रतिसाद मिळाल्यावर झी युवावरील लोकप्रिय म्युजिक रिऍलिटी शो 'संगीत सम्राट पर्व' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहे. 'संगीत सम्राट पर्व' हे जरा हटके असणार आहे जे प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल.संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान आणि होतकरू गायक व संगीतकारांसाठी संगीत सम्राटने एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. १ल्या पर्वात पाहिलेल्या एकसे बढकर एक स्पर्धकांनंतर आता दुसऱ्या पर्वात त्याहीपेक्षा उत्कृष्ट आणि टॅलेंटेड स्पर्धक भाग घेतील आणि त्यासाठी परीक्षक देखील तितकेच उत्तम आहेत.या पर्वात आदर्श शिंदे सोबत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. शास्त्रीय संगीतात वर्चस्व असलेल्या या परीक्षकाकडून दाद मिळवण्यासाठी स्पर्धकांना त्यांचं २००टक्के द्यावं लागणार आहे. या आधी एक सिंगिंग रिअॅलिटी शोच परीक्षण केल्यानांतर या आगळ्या वेगळ्या म्युजिक रिऍलिटी शोच परीक्षण करण्याचा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे. राहुल देशपांडे यांच्या श्रवणीय गाण्यांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे तसेच संगीत क्षेत्रात देखील त्यांचं मानाचं स्थान आहे.राहुलचं संगीत क्षेत्रातील मोलाचं योगदान व शास्त्रीय संगीतात असलेला अनुभव लक्षात घेता राहुलकडून सर्व स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन मिळेल यात शंकाच नाही. संगीत सम्राटमध्ये सहभागी होण्यासाठी वयाला कुठलेली बंधन नाही आहे. ४ वर्षावरील कोणीही या स्पर्धेत सहभागीहोऊ शकतं. हे दुसरे पर्व प्रेक्षकांसाठी अजून किती सरप्रायजेस देणार आहेत हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.नुकतेच संगीत 'सम्राट पर्व २' चे ऑडिशन्स नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि मुंबई या शहरात पार पडले. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला होता. या दोन्ही बहिणींनी सुरुवातीपासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत दोन्ही परीक्षक आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या पहिल्या परफॉर्मन्सपासून आदर्श आणि क्रांती या दोघांनीही या दोघांचेही भरभरून कौतुक केले होते. महा अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी जय्यत तयारी केली होती. शात्रीय संगीताचा वारसा  लाभलेल्या या बहिणींनी निरनिराळे परफॉर्मन्सच्या सादर करत आपले सांगीतिक क्षेत्रातील टॅलेंट दाखवुन दिले आहे.