'यह रिश्ता क्या कहता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. तिचा साखरपुडा झाला होता आणि त्यानंतरच तिने आत्महत्या केली. आता या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात चलान सादर केले आहे. पोलिसांनी चलानमध्ये सांगितले आहे की, आरोपी राहुल नवलानी याने अंघोळ करताना तिचे व्हिडिओ शूट केला होता. तिचं लग्न ठरल्यानंतर राहुलने हा व्हिडिओ तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला होता, त्यामुळं लग्न मोडलं. यानंतर वैशालीने आत्महत्या केली होती.
कधी बनवला व्हिडीओहा व्हिडिओ ऑगस्ट २०२१ मध्ये गोव्यात बनवण्यात आला होता. येथे वैशाली राहुलसोबत गोव्यातील एका हॉटेलमध्ये तीन दिवस राहिली. दोघेही भेटायला आले होते आणि लग्नाची बोलणी झाली होती. यादरम्यान राहुलने व्हिडिओ बनवला होता. याची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी वैशालीचा होणारा नवरा मितेश गौर याच्याकडूनही माहिती मागवली आहे.
राहुलला मिळाला जामीन या प्रकरणात आरोपी राहुल नवलानी याला जामीन मिळाला आहे. यावर वैशालीच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदवला होता पण त्याला जामीन मिळाला. आता पुन्हा एकदा पोलिसांच्या चलानमुळे राहुलच्या अडचणी वाढू शकतात.
स्टार प्लस शोमधून लोकप्रियता मिळालीवैशाली ठक्करने स्टार प्लसवरील शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष-अमृत' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. ऑक्टोबर 2022 मध्ये, वैशालीने इंदूरच्या साईबाग कॉलनीतील तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहूल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्याविरुद्ध कलम ३०६ (हत्येसाठी प्रवृत्त) गुन्हा दाखल केला आहे.