Join us

थाटात पार पडलं राहुल वैद्यच्या लेकीचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच अर्थपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:35 IST

Rahul vaidhya: मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राहुल-दिशाने त्यांच्या लेकीचं बारसं केलं.

इंडियन आयडॉल या सिंगिंग रिअॅलिटी शोमधून नावारुपाला आलेला राहुल वैद्य सध्या त्याच्या लेकीमुळे चर्चेत येत आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी अभिनेत्री दिशा परमार हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून नेटकऱ्यांमध्ये या बाळाविषयी चर्चा रंगली आहे. या गोड बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. यामध्येच राहुल आणि दिशाने मोठ्या दणक्यात त्यांच्या लाडक्या लेकीचं बारसं केलं.

लेकीच्या जन्माच्या दोन महिन्यानंतर तिचं बारसं करण्यात आलं आहे. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या बारशाचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच त्यांच्या मुलीचं नावदेखील सांगितलं आहे.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये राहुलने त्याच्या लेकीचं बारसं केलं. राहुल आणि दिशाने त्यांच्या लेकीचं नाव नव्या असं ठेवलं आहे. नव्या या नावाचा अर्थ खूप सुरेख आहे. नव्या म्हणजे एक सुंदर मुलगी जी सगळ्यांच्या कौतुकाचं पात्र असते.

टॅग्स :राहुल वैद्यटेलिव्हिजनसेलिब्रिटीइंडियन आयडॉल