'रायझिंग स्टार 2' प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 10:47 AM
स्वप्ने पाहण्याला आणि महत्वाकांक्षेला काही वय नसते. तसेच त्यांना मर्यादा किंवा एखाद्याची परिस्थितीचाही अडथळा येत नाही- त्यात फक्त शुध्द ...
स्वप्ने पाहण्याला आणि महत्वाकांक्षेला काही वय नसते. तसेच त्यांना मर्यादा किंवा एखाद्याची परिस्थितीचाही अडथळा येत नाही- त्यात फक्त शुध्द कौशल्य पाहिले जाते. रिअॅलिटी गायनामध्ये कलर्सने भावना, विचार आणि पूर्वग्रहांनी बनलेल्या विचारांच्या प्रक्रियांचे अडथळे तोडून टाकत भारताचा पुढील संगीत सेन्सेशन शोधण्याचा प्रवास सुरू केला आहे. सीझन 1 च्या दिमाखदार यशानंतर, चॅनेलने आता शुध्द टॅलेंट प्रदर्शित करण्यासाठी रायझिंग स्टार 2-भारताचा पहिला लाइव्ह शो पुन्हा आणण्याची तयारी केली आहे. ऑप्टिमिस्टीक एंटरटेनमेंट द्वारा निर्मित हा शो प्रेक्षक व्यस्तते मध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज होत आहे, 20 जानेवारी 2018 पासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री 9.00 वाजता फक्त कलर्स वरच स्वयंपाकघरात जेवण बनविणारी महिला असो, रोजीरोटीसाठी लोकांना वाहून नेणारा रिक्षा ड्रायव्हर असो, किंवा एखादा छोटा खाद्यपदार्थ पोहचविणारा डिलीव्हरी बॉय असो जगाला रिझविण्याची ताकद आणि कौशल्य सर्वांमध्येच असते हे रायझिंग स्टार 2 मधून दाखविले जाणार आहे. घरगुती हिंसाचाराविरुध्दची तुमची लढाई असो किंवा एकटी आई असो किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असो या मंचावर येऊन पुढील रायझिंग स्टार बनण्यासाठी यातील काहीही तुम्हाला रोखू शकणार नाही. सोच की दीवार उघडण्यासाठी प्रत्येकाने एकत्र या आणि #UthaoSochKiDeewar and #RisingStar2 या हॅशटॅग द्वारे चमकदार स्टार बनण्यासाठी तयार व्हा. व्हियाकॉम 18 चे सीओओ, राज नायक शोच्या प्रारंभा विषयी बोलताना म्हणाले, “सामान्य माणसावरील बंधने तोडण्यासाठी बिग बॉसच्या घरातील प्रवेश तो चमकण्यासाठी रायझिंग स्टारची भिंत उचलणे असो पूर्वापार परंपरा तोडून टाकणे आणि बदल घडवून आणण्याचा आम्ही कलर्स मधून सतत प्रयत्न करत असतो. बिग बॉसच्या या सीझनचे यश हे त्याचेच उदाहरण आहे आणि आम्हाला विश्वास आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातील निष्ठावंत प्रेक्षकांना आम्ही असेच व्यस्त करण्यात यशस्वी होऊ. ”