छोट्या पडद्यावर 'राजा रानीची गं जोडी 'ही मालिका सध्या गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिकेच्या यादीत ही मालिकाही गणली जात आहे. अल्पावधीतच या मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेतची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
मालिकेत दिवसेंदिवस घडणा-या रंजक घडामोडींमुळे रसिकही खिळून आहेत. मालिकेप्रमाणे कलाकारही रसिकांचे आवडते बनले आहेत. रसिकांना निराश करणारी बातमी आहे. मालिकेतली रसिकांची आवडती अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री श्वेता खरातनेही ही मालिका सोडल्यानंतर मनं झालं बाजिंद मालिकेत ती आता मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे आधीच समोर आले होते. आता तिच्यापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याचे समोर आले आहे. संजूच्या आईची भूमिका करणारी कल्याणी म्हणजेच कल्याणी चौधरीनेही मालिका सोडली आहे. आता कल्याणी 'मन झालं बाजींद' या मालिकेत दिसणार आहे.
संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात. रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीस काढला आहे. संजूने प्राण पणाला लावून रणजीतची सुटका केली. आता रणजीतच्या साथीने ती अपर्णाचं सत्य देखील घरच्यांच्या समोर आणणार आहे. त्यासाठी रणजीतसोबत ती नवी खेळी देखील रचते आहे. याचसोबत डॉक्टर तोडकरच्या दवाखान्याचा पर्दाफाश कसा करता येईल यासाठी रणजीत तिला योग्य ते मार्गदर्शन करतो आहे. घर आणि कामातील जबाबदार्या संजू उत्तमरीत्या पार पाडते आहे.
रणजीत आणि संजीवनीने आता एकच ध्यास घेतला आहे कसं गुन्हेगारीला पुर्णपणे दूर करता येईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त संजूचा खूप मोठा सत्कारही करण्यात आला. रणजीतला झालेल्या अटके प्रकरणाच्या संजू पूर्ण मुळाशी गेली आणि बनावटी औषधा प्रकरणी खर्या गुन्हेगाराला अटक केली. याबाबत तिचा हा सत्कार होणार आहे. आसा ट्रॅक सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे.आगामी काळात मालिकेत नवीन ट्विस्ट पाहणेही रंजक असणार आहे.