Join us

राजा राणीची गं जोडीमधील संजू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:00 IST

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची जोडी’ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची जोडी’ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेमध्ये संजीवनी आणि रणजित यांच्या केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. संजीवनीने आपल्या सोज्वळ अंदाजात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत संजीवनीची भूमिका शिवानी सोनार साकारतेय. 

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेमुळे शिवानी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली. मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या दमदार अभिनयामुळे शिवानीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. शिवानीच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास मॉर्डन ड्रेसिंग स्टाईलची झलक पाहायला मिळते. 

संजू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले नवंनवं फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पडद्यावर साधी सरळ दिसणारी संजीवनी खऱ्या आयुष्यात मात्र भलतीच ग्लॅमरस आहे.  गेल्या काही दिवसांत शिवानीने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे.

विविध स्टाईलमधील शिवानीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत. काही फोटोमध्ये शिवानीचा निरागसपणा दिसून येत आहे. तर काही फोटोंमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात.

टॅग्स :राजा रानीची गं जोडीटिव्ही कलाकार