'खिचडी' (Khichadi) या विनोदी शोमध्ये प्रफुल पारेखची भूमिका साकारणारे अभिनेते राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी काम मिळतच नसल्याची खंत व्यक्त केली आहे. 'खिचडी' मधील त्यांची विनोदी भूमिका सगळ्यांनाच आवडली. या शोनंतर त्यांना ऑफर्स मिळतील अशी आशा होती. मात्र तसं झालं नाही. केवळ वडील-सासऱ्याच्याच भूमिका ऑफर होत असल्याचंही ते म्हणाले.
'खिचडी' हा विनोदी हलकाफुलका शो अनेकांच्या आवडीचा आहे. अतिशय साधी सरळ पारेख फॅमिली, त्यातले प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राजीव मेहता म्हणाले, "मी अंडररेडेट आहे. खिचडी सारखा शो आणि सिनेमात काम करुनही मला मेकर्सकडून चांगल्या भूमिका ऑफर होत नाहीत. जेव्हा मी रंगीला सिनेमातून करिअरला सुरुवात केली तेव्हा कोणीच मला नोटीस केलं नाही. पण जेव्हा आमिरने वेटरला AC त्याच्याकडे करण्यास सांगितलं तर तो हिट झाला. हा खूप छोटा रोल होता. चांगले डायलॉग्स आणि ह्युमरमुळे ही चांगली सुरुवात होती."
ते पुढे म्हणाले, "मी बुढ्ढाहोगा तेरा बाप सिनेमा केला पण तो चालला नाही. पण त्यात काम करायला मला मजा आली. मी नीरज पांडेच्या सिनेमासाठी शूट करत आहे. टॅलेंटेड मेकर्ससोबत काम करुनही मला चांगल्या भूमिका ऑफर झाल्या नाही. मी खिचडी और बा बहू और बेबी सारख्या शोचा भाग राहिलो. मला कधीच मालिकांमध्ये वडील किंवा सासऱ्याची भूमिका करायची नव्हती. सध्या डेली सोप्समध्ये चांगला कंटेंट तयार होत नाहीए."
राजीव मेहता यांना 'खिचडी' शोमुळेच जास्त ओळख मिळाली. त्यांनी 'साराभाई व्हर्सेस साराभाई', 'करिष्मा का करिष्मा', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ,'बडी दूर से आये है' या मालिकांमध्ये काम केले आहे.