Join us  

प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 3:27 PM

अभिनेता म्हणाला, "मी शेतकरी झाल्यानंतर दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतलं होतं."

अभिनेता राजेश कुमार सारा भाई वर्सेस सारा भाईमध्ये रोसेशची भूमिका साकारून चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाला. पण जेव्हा त्याने शेतकरी होण्याचा विचार केला तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला की, जेव्हा त्याने त्याच्या मित्रांकडे मदत मागितली तेव्हा त्यांच्यापैकी काही लोकांनी ग्राहक बनून त्याला मदत केली, तर बाकीच्यांनी त्याचा फोनही उचलला नाही.

अभिनेता म्हणाला, "मी शेतकरी झाल्यानंतर दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतलं होतं. माझे मित्र आणि कुटुंबीयांनी माझ्या वर्षभराच्या प्रवासात गुंतवणूक केली होती, जो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. ज्यांनी मला पैसे दिले त्यांना मला उत्तर द्यायचं होतं.... माझे कुटुंब, शेतकरी आणि माझी पत्नी."

अभिनेत्याने पुढे सांगितलं की, जेव्हा त्यांचं स्टार्टअप चाललं नाही तेव्हा त्याला भाजी विकावी लागली होती. त्याने आपल्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीचा स्टॉल लावल्याची आठवण सांगितली. जिथे त्याचा मुलगा त्याच्या शिक्षकांना भाजी घ्यायला सांगायचा. एवढंच नाही तर राजेशने शार्क टँक इंडियामध्येही भाग घेतला होता. मात्र तो तिथे रिजेक्ट झाला. 

राजेश कुमार म्हणाला, "मी शार्क टँक इंडियामध्ये अप्लाय केलं. मी तीनपैकी दोन राऊंड पार केल्या. तुम्हाला एक व्हिडीओ देखील सबमिट करावा लागतो, त्यामुळे मला वाटलं मी एक ओळखीचा चेहरा असल्याने मला कदाचित पसंती मिळेल. मी एक अभिनेता आहे, उद्योजक आहे आणि शेतीबद्दल बोलत आहे. माझे प्रेझेनटेशन कोलकात्यात होतं आणि ते एका दिवसात पूर्ण झालं. माझ्या वडिलांनी तिकिटांचे पैसे दिले."

"शार्क टँकमधून निघण्याआधी मला हड्डीच्या टीमकडून कॉल आला की, डायरेक्टर आणि कास्टिंग टीम मला भेटू इच्छित आहे. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो आणि माझा आत्मविश्वास कमी होता. पण जेव्हा त्यांनी मला ऑडिशन न देता कन्फर्म केलं तेव्हा मी त्यांना ऑडिशनबद्दल विचारलं आणि त्यांनी सांगितलं की, त्यांना मला घ्यायचं आहे. पण डायरेक्टरने एक अट घातली की टक्कल करावं लागेल. असं केल्यास आणखी एक लाख देऊ." 

टॅग्स :टिव्ही कलाकारशेतीशेतकरी