कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. दिल्लीच्या AIIMSरुग्णालायात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे हास्य जगतावर मोठी शोककळा पसरली आहे.गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. राजू श्रीवास्तव यांना ब्रेन स्ट्रोकदेखील आता होता. त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक होती. जगभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत, मात्र आज त्यांचं दु:खद निधन झालं आहे.
लहानपणापासूनच मिमिक्रीची आवड राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. लहानपणीच त्यांना सत्यप्रकाश श्रीवास्तव हे नाव देण्यात आले. राजू यांचे वडील एक प्रसिद्ध कवी होते, जे बलई काका या नावाने प्रसिद्ध होते. राजू यांना मोठं होऊन वडिलांप्रमाणे प्रसिद्ध व्हायचं होतं आणि काहीतरी मोठं करायचं होतं. राजूला लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. यामध्ये त्याला आपले करिअर करायचे होते.
जिथे संधी मिळेल तिथे ते मिमिक्री सुरू करायचे. लोक राजू यांना त्याच्या एखाद्या फंक्शनमध्ये किंवा वाढदिवसाच्या पार्टीत कॉमेडियन म्हणू लागले. हळूहळू काही छोट्या रंगमंचाच्या भूमिकाही राजू यांना ऑफर झाल्या. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, एकदा ते एका पार्टीत गेला होते आणि परफॉर्मन्स दिला होता. कार्यक्रम संपल्यावर एका व्यक्तीने त्यांना 50 रुपये दिले. राजू यांना वाटले की ही त्यांची फी आहे पण त्या व्यक्तीने सांगितले की तू एक उत्तम विनोदी कलाकार आहेस. हा पुरस्कार आहे. त्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले की आता आपल्याला या ठिकाणी बंदिस्त राहण्याची गरज नाही.
मुंबईत येऊन रिक्षा चालवली राजू यांना आपला परफॉर्मेन्स मोठ्या रंगमंचावर करायचा होता. त्यामुळे ते मुंबईत आले, पण इथे आल्यानंतर त्याला बराच काळ चांगली ऑफर मिळाली नाही. त्यामुळे काही स्टेज शो सोडून जगण्यासाठी ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली, पण हिंमत हारली नाही. पुढे त्यांना काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेची ऑफरही आली. ज्यामध्ये 'तेजाब', 'बाजीगर', 'मैने प्यार किया' इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. पण या चित्रपटांमधून राजू यांना ओळख मिळवता आली नाही.
एका शोने बदलले आयुष्य मुंबईत आल्यानंतर राजू छोट्या छोट्या भूमिका करत होते. या वेळी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' सुरू झाले, ज्यामध्ये राजू श्रीवास्तव यांनीही सहभाग घेतला. शोमधील त्याची कॉमेडी आवडली आणि हा शो नंतर त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या शोमध्ये तो 'गजोधर' या व्यक्तिरेखेने ते घरोघरी पोहोचले.
राजू श्रीवास्तव या शोचा सेकंड रनर अप होते. जर आपण राजू श्रीवास्तव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर त्यांनी शिखा श्रीवास्तव यांच्याशी 1993 मध्ये लग्न केले आणि दोघांना 2 मुले आहेत. राजू श्रीवास्तव हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.
लग्जरी कार मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती 15-20 कोटींच्या दरम्यान आहे. स्टेज शो, जाहिराती आणि अभिनयातून हा त्यांचा इन्कम सोर्स होता. लाइव्ह परफॉर्मन्ससाठी 5 लाख रुपयांपर्यंतचं मानधन ते आकारायचे. राजू यांच्याकडे Audi Q7 आणि BMW 3 सारखी लक्झरी कार आहेत ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे.