Raju Srivastava news: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. राजू श्रीवास्तव यांना दिल्या जाणाऱ्या ट्रिटमेंटला ते सकारात्मक प्रतिसाद देतायेत. मात्र ते अजूनही व्हेंटिलेटरवर असून ब्रेन रिस्पॉन्ड देत नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूवर उपचारांनाचा कोणताही परिणाम होत नाही.
कुटुंबीयांनी जारी केलं स्टेटमेंटराजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितले. कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितलं आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. डॉक्टरांची टीम संपूर्ण त्यांची काळजी घेत आहे. सर्व शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका. कृपया राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंब.
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराने सांगितले होते की, "त्यांच्या प्रकृती अजूनही गंभीर आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून ते ICUमध्ये आहेत. आयसीयूमध्येच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्याची प्रकृती सुधारली नाही किंवा बिघडलेली नाही. डॉक्टरांची संपूर्ण टीम प्रयत्न करतेय. आम्ही फक्त प्रार्थना करत आहोत आणि आशा करतो की ते लवकर बरे होतील.
१० ऑगस्टला जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.