Raju Srivastava prayer meet: लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) आता या जगात नाहीत. 21 सप्टेंबरला दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काल 25 सप्टेंबरला मुंबईत राजू श्रीवास्तव यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. टीव्ही इंडस्ट्रीतीले अनेक दिग्गज या प्रार्थना सभेत सहभागी झालेत. जॉनी लिव्हर, सुनील पॉल, कपिल शर्मा, भारती सिंग, किकू शारदा अशा अनेकांनी राजू यांना आदरांजली वाहिली. सर्वांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा, मुलगी अंतरा व मुलगा आयुष्यमान यांचं सांत्वन केलं. प्रार्थनासभेत बोलताना राजू यांच्या पत्नी शिखा यांना अश्रू अनावर झालेत.
(साभार )
क्या कहूं मेरी तो जिंदगी ही चली गई...जहां भी राजू होंगे सबको हंसा रहे होंगे... म्हणत त्यांच्या अश्रूचा बांध फुटला.रविवारी मुंबईच्या इस्कॉन मंदिरात राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. प्रार्थना सभेत शिखा यांना बोलायची विनंती केली गेली. माईक हाती येताच, त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. त्या हुंदके देत रडू लागल्या. आईला रडताना बघून मुलगी अंतरा समोर आली, तिने आईला सावरलं. यावेळी शिखा यांनी सर्वांचे आभार मानले. राजू यांना जीवदान मिळावं यासाठी अख्ख्या देशाने प्रार्थना केली. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. राजू यांनी सर्वांना हसवलं. ते जिथे कुठे असतील, तिथेही सर्वांना हसवत असतील, असं त्या म्हणाल्या. यावेळी सर्व वातावरण भावुक झालं होतं. तुम्हा सर्वांचे आभार, तुम्हा सर्वांनी कठीण काळात आम्हाला धीर दिला. सहकार्य केलं. थँक्यू असं म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
राजू श्रीवास्तव गेल्या 10 ऑगस्टला जिममध्ये वर्कआऊट करताना कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. 42 दिवस राजू व्हेंटिलेटरवर होते. यादरम्यान त्यांना शुद्ध आल्याच्या बातम्या आल्या. मात्र राजू यांची मुलगी अंतराने या सगळ्या अफवा होत्या, असं आता स्पष्ट केलं आहे. त्या दिवशी त्यांना रूग्णालयात नेलं आणि ते कधीच शुद्धीवर आले नाहीत. 21 सप्टेंबरला ते आम्हाला कायमचे सोडून गेलेत, असं अंतरा म्हणाली.