हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात कॉमेडियनने अखेरचा श्वास घेतला. राजू यांची जवळपास ४० दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. पण राजू श्रीवास्तव यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, राजूच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्यांची मुलगी अंतरा हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राजू श्रीवास्तव गुरूवारी पंचतत्त्वात विलीन झाले. दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साश्रू नयनांनी सर्वांनी त्यांना निरोप दिला. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर राजूची मुलगी अंतरा हिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत त्याने राजूच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत.