Join us

करणची जागा राकेश घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2016 11:59 AM

बहू हमारी रजनि_कांत या मालिकेला नुकताच करण. व्ही. ग्रोव्हरने रामराम ठोकला. करणने वेडिंग पुलाव या चित्रपटात काम केले होते. ...

बहू हमारी रजनि_कांत या मालिकेला नुकताच करण. व्ही. ग्रोव्हरने रामराम ठोकला. करणने वेडिंग पुलाव या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर सध्या त्याला आणखी एका चित्रपटाची ऑफर आली आहे. या चित्रपटासाठी त्याने बहू हमारी रजनि_कांत ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. करणने ही गोष्ट प्रोडक्शन हाऊसला काही दिवसांपूर्वीच कळवली होती. त्यानंतर आशिष चौधरी, हिमांशू मल्होत्रा, राकेश बापट यांसारख्या अभिनेत्यांचा या भूमिकेसाठी विचार करण्यात आला. या सगळ्यांमध्ये राकेश या भूमिकेसाठी योग्य आहे असे प्रोडक्शन टीमला वाटत असल्याने राकेशची निवड करण्यात आली. करण केवळ सप्टेंबरपर्यंतच चित्रीकरण करू शकतो असे त्याने आधीच टीमला कळवले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शानची व्यक्तिरेखा मालिकेतून गायब झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांत राकेश चित्रीकरणाला सुरुवात करणार असून त्यानंतर शान पुन्हा मालिकेत दाखवला जाणार आहे.