Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यातला ड्रामा काही संपण्याचे नाव घेत नाही. पती आदिल दुर्रानी खानवर तिने लावलेल्या आरोपांनंतर आदिलला अटक झाली आहे. काल त्याला अंधेरी कोर्टातही हजर करण्यात आले. फसवणूक झाल्याने राखी पूर्णपणे तुटली आहे. पापाराझींनी पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडिओत राखी दु:ख व्यक्त करताना दिसत आहे.
मै एक जिंदा लाश हॅूं
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत राखी सावंत म्हणते, 'मै एक जिंदा लाश हॅूं, कोणता आनंद साजरा करु, मला संसार करायचा होता, इतकं मोठं ऑपरेशन होऊनही मला आई व्हायचं होतं. पण ७ महिन्यांपासून मी जे काही सहन केलं आहे. आदिलने मला जिंदा लाश बनवलं आहे. त्याचे वडीलही त्याच्यासोबत सामील आहेत, माझे १.५ कोटी रुपये घेतले, कार घेतली. दोघांनी मिळून केलं आहे. '
आणखी एका व्हिडिओमध्ये राखीला चक्कर आल्याचं, ती ढसाढसा रडत असल्याचंही दिसत आहे. माझ्यासोबत खुदा आहे, मला सोडा, तो बाहेर येऊन लग्न करणार आहे. राखीची अगदीच वाईट अवस्था झाल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
Rakhi Sawantची आदिलनं केली मोठी फसवणूक, तिच्या हाती लागला मोठा पुरावा
राखी सावंतचा पती आदिल सध्या जेलमध्ये आहे. राखीने त्याच्यावर मारहाणीचे, चोरीचे आरोप केले आहेत. आईच्या मृत्यूच्या दिवशी सुद्धा त्याने राखीला मारहाण केल्याचा खुलासा राखीचा भाऊ राकेश सावंतने केला होता. राखी सध्या अतिशय वाईट काळातून जात असल्याचं दिसून येतंय. राखी सावंतने मीडियासमोर तिच्या आणि आदिलच्या लग्नाचा खुलासा केला होता. एवढेच नाही तर त्यांनी निकाहचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. एवढेच नाही तर तिने धर्म बदलून स्वतःचे नाव फातिमा ठेवले होते.