Join us

भररस्त्यात राखी सावंतला ड्रामा करणं आलं अंगाशी, पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 2:09 PM

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह नाही. या ना त्या कारणानं सतत चर्चेत येत असते.

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह नाही. रोज नव्या कारणानं ती चर्चेत असते. वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकते. राखीने पुन्हा एकदा एक नवा ड्रामा केला आहे. जो पाहून नेटकरीही तिच्यावर संतापले आहेत. नुकतीच राखी सावंत मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान तिने रस्त्यात कार उभी केली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

राखीने कारमध्येच उभी केल्यामुळे  रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागत वाहतूककोंडी निर्माण झाली होती. गाडीजवळ आल्यावर ती म्हणते, आपण जिथे उभे आहोत, तिथून लाइन सुरू होते, थांबा. राखीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.  आणखी एका युजरने म्हटले - हे अत्यंत चुकीचे आहे, ती अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या वाहतुकीला अडथळा आणू शकत नाही, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी. 

 प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीन आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर राखी सावंतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी राखी सावंतला 'नोटंकी' म्हणत  मुंबई पोलिसांना टॅग करत राखीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका यूजरने लिहिले की, "या नौटंकी महिलेवर केस करा", दुसऱ्याने लिहिले की, "मुंबई पोलिसांना कारवाई करून एक उदाहरण ठेवावे लागेल." "त्यांना फक्त लक्ष देण्याची गरज आहे आणि ते ते मिळवत आहेत," एक म्हणाला. तसेच ट्रॅफिक जाम झाल्याने अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत.प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीन आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर राखी सावंतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. दरम्यान राखीने मुंबईच्या भररस्त्यात आपली कार थांबवत वाहतूककोंडी केल्याने तिच्या वाहनासंबंधी ई-चलन जारी करण्यात आलं आहे.

टॅग्स :राखी सावंतटिव्ही कलाकार