Rakhi Sawant : राखी सावंत पोहोचली आश्रमात, लहान मुलांना ५०० रुपयांची नोट देत म्हणाली, 'दवा और दुआ...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 04:47 PM2023-01-23T16:47:10+5:302023-01-23T16:47:21+5:30

सध्या राखीच्या आईची तब्येत चिंताजनक आहे. ती क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल असून ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे.

Rakhi Sawant distributes snacks and money to children in an ngo says blessings and medicines works | Rakhi Sawant : राखी सावंत पोहोचली आश्रमात, लहान मुलांना ५०० रुपयांची नोट देत म्हणाली, 'दवा और दुआ...'

Rakhi Sawant : राखी सावंत पोहोचली आश्रमात, लहान मुलांना ५०० रुपयांची नोट देत म्हणाली, 'दवा और दुआ...'

googlenewsNext

Rakhi Sawant :  ड्रामा क्वीन राखी सावंतचा ड्रामा काही संपण्याचं नावच घेत नाही. आता ती खरंच ड्रामा करते की खरं खरं नागते हेही कळायला मार्ग नसतो. सध्या राखीच्या आईची तब्येत चिंताजनक आहे. ती क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल असून ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. दरम्यान राखी आईच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहे. नुकतीच तिने एका आश्रमाला भेट दिली. तेथील मुलांसोबत वेळ घालवला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी राखीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राखी एका अनाथाश्रमात आली आहे आणि तिथल्या मुलांचे लाड करत आहे. 'दवा और दुआ दोनो काम आती है' असं ती म्हणते. राखी मुलांना आधी कुरकुरे, चिप्स देते, नंतर ती ५०० रुपयांचे बंडल काढते आणि प्रत्येकाला ५०० रुपयांची नोट देते. यावेळी राखी म्हणते, 'प्रार्थना आणि औषधं यामुळेच व्यक्तीला वाचवता येते. मी पण यांच्यातलीच आहे माझंही शिक्षण इथेच झालं आहे'असं म्हणत राखी भावूक होते.'

काही दिवसांपूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्राने राखीवर प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी राखीची अंबोली पोलिसांनी चौकशी केली आणि नंतर तिला सोडण्यात आले. सध्या राखी नवरा आदिलसोबत तिच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असते. दरम्यान बुरखा घातल्याने राखीला ट्रोलही करण्यात आले होते.

Web Title: Rakhi Sawant distributes snacks and money to children in an ngo says blessings and medicines works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.