आयटम गर्ल राखी सावंतच्या प्रत्येक अदावर सारे लट्टू...... ती कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नाही....आता हेच पहा. गेल्या काही दिवसांपासून विवाहीत असल्याचा दावा राखी करते. मात्र आजपर्यंत तिच्या पती रितेश कधीच जनतेसमोर आलेला नाही. इतकेच काय तर लग्न झाले त्याच दिवशी पती रितेश तिला सोडून गेला तो परत कधी आलाच नाही.
तो कधी परतेल याचीच राखी सावंत वाट बघत असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा लग्न खरोखर झाले आहे यात मी कोणत्याही प्रकारचा ड्रामा करत नसल्याचे ती वारंवार सांगते. सध्या 'बिग बॉस १४' मध्ये राखी धुमाकुळ घालत आहे. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. सगळेच राखी उत्तम एंटरटेनर असल्याचे सांगत तिचे कौतुक करत असतात.
दुसरीकडे अभिनव आणि रुबीन दिलैक या कपलची केमिस्ट्री पाहून राखी सावंतलाही पती रितेशला भेटायची इच्छा होते. पती येत नसेल तर मलाही अभिनवसह लग्न करण्याची इच्छआ आहे. किती छान कपल आहे. रुबीनाला काही हरकत नसेल तर मी अभिनवसह लग्न करेन असेही ती सांगते. इतर स्पर्धकांसह नेहमीच राखीचे खटके उडत असतात. मात्र रूबीना आणि अभिनव या दोघांसह तिची चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळते. कधीच इतरांसारखे भांडण ती या दोघांसह करत नाही. उलट या दोघांच्या सपोर्टमध्येच नेहमी राखी बोलत असते.
‘बिग बॉस 14’चा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. हा प्रोमो इतका मजेदार आहे की, क्षणात तो व्हायरल झाला. यात राखी कन्फेशन रूममध्ये आहे. कन्फेशन रूममध्ये बिग बॉस राखीची विचारपूस करतात आणि राखी ढसाढसा रडू लागते. माझ्या पतीने सर्वांसमोर यावे, असे मला वाटतेय. मी सर्वांच्या नवºयांना पाहते, तेव्हा मला काही व्हायला लागते. काय मी रूबीनाच्या पतीला चोरू? तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली तर तिला लाईक करणे गुन्हा आहे का बिग बॉस? असे ती म्हणते. यावर अजिबात गुन्हा नाही, असे बिग बॉस म्हणतात. हा प्रोमो पाहून येत्या एक-दोन दिवसांत राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात येईल, असे मानले जातेय. राखीच्या पतीला अद्याप कोणीही पाहिले नाही. मात्र हाच राखीचा पती आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे.