बिग बॉस 14 फेम राखी सावंत (Rakhi Sawant) तशी ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. पण सध्या राखी जाम भडकली आहे. कोणावर तर आयपीएलवर. होय, कोरोना काळात आयपीएल स्पर्धा खेळली जात असल्याचे पाहून राखी भडकली. (Rakhi Sawant got angry on ipl match going on in mumbai )देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राज्यांत लॉकडाऊन आहे आणि रोज शेकडो लोक कोरोनामुळे प्राण गमवत आहेत आणि अशात कुंभमेळा व आयपीएलसारखे इव्हेंट साजरे होत आहेत. यावर राखीने आपला संताप व्यक्त केला.
तू कोणत्या आयपीएल टीमला फॉलो करते आहेस? असा प्रश्न अलीकडे एका पत्रकाराने राखीला विचारला. हा प्रश्न ऐकला आणि राखी भडकली. ‘वाह, मुंबई में लोग मर रहे हैं. हमारी जिंदगी झंड हो गई है और लोग यहां आयपीएल खेल रहे है. हम लोग छुप छुप कर गाडी चला रहे है और लोग आयपीएल खेल रहे हैं, वाह,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.पुढे राखी आणखी बरेच काही बोलली. जे ऐकून कदाचित तुम्हाला हसू आवरणार नाही. मुंबईत लॉकडाऊन आहे म्हणून लोक सुट्टी घालवण्यासाठी मुंबईबाहेर पळून गेले आहे. फक्त मी एकटी मुंबईत आहे. सगळे मुंबईतून पळून गेले असल्याने आता तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कोणीही भेटणार नाही. सगळे मालदीवला एन्जॉय करत आहेत. ते मालदीवला जातात आणि मालदीवच्या समुद्रात कोरोनाला जलसमाधी देऊन परत येतात, असे राखी म्हणाली.
आईच्या तब्येतीबद्दलही दिली माहितीराखीची आई सध्या कॅन्सरशी लढतेय. राखीने आपल्या आईच्या तब्येतीची माहितीही यावेळी दिली. मी खूप टेन्शनमध्ये आहे. आईला रूग्णालयात भरती करायचे आहे. हा कोरोना कधी जाईल, याचेही टेन्शन आहे, असे ती म्हणाली. कालपरवा राखी लोकांना मास्क लावा, असे आवाहन करताना दिसली होती.