Join us

Rakhi Sawant नव्या लव्हस्टोरीत ट्वीस्ट, BF च्या एक्स गर्लफ्रेन्डची एन्ट्री; म्हणाली, “४ वर्षांपासून…”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 10:14 AM

एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. पण आता तिच्या लव्ह स्टोरीत एक ट्वीस्ट आलाय.

प्रेम एक अशी भावना आहे जी व्यक्तीला भरपूर आनंद देते. एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. रितेशसोबत वेगळी झाल्यावर राखी सावंतला आदिल खान दुर्रानीच्या रूपात नवा जोडीदार मिळाला आहे. आदिलची साथ मिळाल्यावर राखी फारच आनंदी दिसत आहे. परंतु आता तिच्या लव्हस्टोरीत एक ट्वीस्ट आलाय.राखी सावंतच्या लव्ह लाईफमध्ये तिच्या बॉयफ्रेन्डच्या एक गर्लफ्रेन्डनं एन्ट्री घेत राखीला शॉक दिलाय.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार Roshani Delavari नावाच्या एका मुलीनं राखी सावंतला कॉल करून ती ज्या आदिल खान दुर्रानीला डेट करतेय तो तिचा बॉयफ्रेन्ड असल्याचं म्हटलं आहे. तसंच ती आणि आदिल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही तिनं केला आहे. तसंच तिनं त्यांच्या शिलेशनशीपविषयी माहिती दिली आणि आदिल पासून दूर राहण्यास सांगितल्याचंही त्यात म्हटलं आहे.काय म्हणाला आदिल?रिपोर्टनुसार रोशिना नावाच्या मुलीचा कॉल आल्यानंतर राखी सावंतनं या विषयी आदिलशी चर्चा केली. दरम्यान, ती आपली एक्स गर्लफ्रेन्ड असल्याचा दाला आदिलनं केलं आहे. तसंच आता आपण तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. दरम्यान रोशिनानं याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.

व्हिडीओ कॉलवर करून दिली होती भेटड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा प्रेमात पडलीये. ‘बिग बॉस १५’नंतर पती रितेश व राखीचं कायमचं बिनसलं. दरम्यान, एका इव्हेंटमध्ये राखीने मीडियाशी आदिलची व्हिडीओ कॉलवर भेट करून दिली होती.

टॅग्स :राखी सावंतटेलिव्हिजन