अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant) ड्रामा पुन्हा सुरु झाला आहे. याला कारण ठरलाय तिचा पती आदिल दुर्रानी (Adil Durrani). तब्बल सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिलची अखेर सुटका झाली आहे. काल त्याने पत्रकार परिषद घेत त्याच्यासोबत काय काय चुकीचं झालं आहे हे सांगितलं. तसंच राखीची त्याने पोलखोल केली. राखी आईच होऊ शकत नाही कारण तिचं गर्भाशयच काढलं आहे असा खुलासा त्याने केला. आदिलचा हा आरोप फेटाळत राखीने थेट डॉक्टरांनाच कॅमेऱ्यासमोर आणलं आहे.
राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या गायनोकॉलॉदिस्ट डॉ वीणा शिंदे यांना कॅमेऱ्यासमोर आणलं आहे. व्हिडिओत राखी सांगते, "आज मी माझी आई, डॉक्टर ते म्हणतात देव सगळीकडे येऊ शकत नाही म्हणून त्याने डॉक्टरांना बनवलं. जेणेकरुन आपलं आरोग्य चांगलं राहील. काही महिन्यांपूर्वी माझं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं.मला आदिलशी लग्न झाल्यानंतर आई व्हायचं होतं. पण माझ्या गर्भाशयात फायब्रॉइड्स होते. वेळीच मी आई झाले असते तर ही वेळ माझ्यावर आली नसती. ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं त्यांच्याकडे मी आले आहे."
डॉक्टर म्हणाल्या,'राखी आई होऊ शकते. तिच्या गर्भाशयात बरेच फायब्रॉइड्स होते. ते काढले आहेत. तिचे गर्भाशय कधीच काढलं नाही केवळ फायब्रॉइड्स काढले. तिचे एग्सही फ्रिज केले आहेत. ती नक्कीच आई होऊ शकते.'
राखीने हा व्हिडिओ शेअर करत आदिलचा आरोप फेटाळून लावला आहे. तसंच तो मला बदनाम करतोय असंही ती म्हणाली आहे. मात्र हा केवळ एक आरोप आहे जो राखीने फेटाळला आहे. या व्यतिरिक्त आदिलने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने त्याला ड्रग्स दिले, माझा न्यूड व्हिडिओ काढला, तिने आधीच्या पतीपासून अद्याप घटस्फोट घेतलेलाच नाही, आई गेल्यानंतर राखी बिर्यानी खात होती, राखीचे माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत असंही तो म्हणाला आहे. आता या सगळ्या आरोपांवर राखी काय बोलते बघावं लागेल.