टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये दरदिवशी नवनवीन घडामोडी घडत आहेत. मात्र शो हवा तसा मनोरंजक वाटत नसल्याने मेकर्सचं टेन्शन वाढलंय. शोचा टीआरपी वाढावा यासाठी मेकर्सकडून एक खेळी करण्याची शक्यता आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खानचा (Adil Khan Durrani) वाद तर सर्वश्रुत आहेच. आता या दोघांची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
राखी सावंत आणि बिग बॉसचं नातं तसं जुनं आहे. ती याआधीही बिग बॉसच्या काही सिझन्समध्ये दिसली आहे. शिवाय मराठी बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली होती. सध्या बिग बॉस 17 सुरु आहे. शोमध्ये काही कंटाळवाण्या स्पर्धकांचा हळहळू पत्ता कट होत आहे. याची सुरुवात नाविद सोलपासून झालीच आहे. नुकतंच नाविदचं मिड वीक एविक्शन झालं होतं. आता शोमध्ये रंजकता आणण्यासाठी राखी सावंत एक्स पती आदिल खानसोबत येऊन धमाका करु शकते. दोघांना घरात सोबत राहावं लागणार आहे. राखीचा ड्रामा पुन्हा नॅशनल टेलिव्हिजनवर दिसण्याची शक्यता आहे.
राखी सावंतने बिग बॉस 15 मध्ये एक्स पती रितेश सिंहसोबत एन्ट्री घेतली होती. याच शोमध्ये तिने रितेशबद्दल पहिल्यांदा खुलासा केला होता. राखीमुळे शोचा टीआरपीही वाढला होता. आता परत राखीला सिझन 17 मध्ये बोलावण्याची चर्चा सुरु आहे.