Join us

राखी सावंतने शेअर केला करवाचौथचा व्हिडिओ, पण या कारणाने झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 1:21 PM

राखीने शेअर केलेल्या फोटोत, व्हिडिओत ती खूपच छान दिसत असून तिचे कौतुक तिचे चाहते करत आहेत. पण एका कारणाने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसगळ्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये आपल्याला तिचा पती रितेश कुठेच पाहायला मिळत नाहीये किंवा त्याचा फोटो देखील आपल्याला दिसत नाहीये. तुझा नवरा कुठे आहे अशी कमेंट करत लोकांनी राखीला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी करवाचौथच्या निमित्ताने सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. ड्रामा क्वीन राखी सावंतने देखील तिचा पती रितेशसाठी करवा चौथचा उपवास ठेवला होता. राखीचा हा पहिला करवा चौथ असल्याने ती चांगलीच उत्सुक होती. तिने तिच्या करवा चौथच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून तिने यात हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच खूप सारे दागिने देखील घातलेले आहेत. एखाद्या नव्या नवरीप्रमाणेच तिने साजश्रृंगार केला आहे. 

राखीने शेअर केलेल्या फोटोत, व्हिडिओत ती खूपच छान दिसत असून तिचे कौतुक तिचे चाहते करत आहेत. तिने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत तिचा पती कसा आहे हे देखील तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. तिच्या पतीचे कौतुक करताना तो किता चांगला आहे हे ती तिच्या चाहत्यांना सांगत आहे. तसेच हातात चाळणी घेऊन देखील तिने पोझ देत फोटो काढले आहेत. पण या सगळ्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये आपल्याला तिचा पती रितेश कुठेच पाहायला मिळत नाहीये किंवा त्याचा फोटो देखील आपल्याला दिसत नाहीये. तुझा नवरा कुठे आहे अशी कमेंट करत लोकांनी राखीला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या फॅन्ससोबत तिच्या सिक्रेट मॅरेजबाबत रोज एक नवा खुलासा करत असते. काही दिवसांपूर्वी तिने फॅन्सना तिचा पती ओळखण्याचा टास्क दिला होता. तर त्यापूर्वी पतीसोबत राहाण्यासाठी मी इंग्लंडला जात असल्याचे तिने म्हटले होते. त्यानंतर तर चक्क एका व्हिडीओत राखीने ती प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला होता. 

राखीने 28 जुलैला मुंबईतील एका पंचताराकित हॉटेलमध्ये गुपचुप लग्न केले असा दावा तिने केला आहे. या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते.

लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पाडले, असे राखीने सांगितले होते. त्यादिवसापासून राखीचं लग्न मिस्ट्री बनून राहिलं आहे. 

टॅग्स :राखी सावंत