Join us

Video : ड्रामा क्वीनचा ‘हॉट’ योगा...! बारीक होण्यासाठी राखी सावंत करतीये प्रचंड मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:00 PM

Rakhi Sawant Video : राखीने बारीक होणं फारच मनावर घेतलं असून तिच्या मेहनतीचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देराखी नेहमीच तिचे हटके व्हिडीओ शेअर करत असते. नुकतचं तिने तिचा नागीन रुपातला फोटो शेअर केला होता.

राखी सावंतला (Rakhi Sawant ) ड्रामा क्वीन म्हणतात, ते उगाच नाही. राखी जिथे कुठे जाईल, तिथे तिची चर्चा होणारच होणार. गेल्या काही दिवसांपासून पापाराझींसोबतचे तिचे व्हिडीओ चर्चेत आहेत. आता काय तर तिच्या फिटनेस व्हिडीओंची चर्चा होतेय. होय, वजन खूप वाढलेय आणि ते घटवण्यासाठी राखी सध्या फिटनेस सेंटरमध्ये घाम गाळतेय. योगा करतानाचे व्हिडीओ तिने शेअर केले आहे. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे या व्हिडीओमुळे राखी ट्रोलही  होतेय.

माय योगा अशा कॅप्शनसह राखीने तीन फिटनेस व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओत राखी इनरवेअरमध्ये योगा करताना दिसतेय. तिचा हा अवतार पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. काहींनी तिची तुलना शहनाज गिलसोबतही केली आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिलने देखील बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वजन कमी केले होते. त्यानंतर मात्र ती प्रसिद्धी झोतात आली होती.  राखीची ही मेहनत पाहता राखी देखील लवकरच तिची सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसेल यात काहीच शंका नाही. लवकरच राखी ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर दिसणर आहे. एक व्हिडीओ शेअर करत खुद्द राखीने याबाबत माहिती दिली होती. 

राखी सावंतची  आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढतेय. राखी ‘बिग बॉस 14’मध्ये असतानाच तिला आपल्या आईच्या आजाराबद्दल कळले होते. आईच्या उपचारासाठी राखीजवळ पैसे नव्हते. शोमधून कमावलेल्या पैशातून ती आईचा उपचार करू इच्छित होती. अशावेळी सलमान खान तिच्या मदतीला धावून आला. राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्याने आपल्या खांद्यावर घेतला आणि काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करत, तिच्या पोटातील कॅन्सरचा ट्युमर बाहेर काढण्यात आला होता.

टॅग्स :राखी सावंत